माणुसकिच्या गर्दीतला दर्दी वैद्यकीय तालुका आरोग्य अधिकारी डाँ.आर आर शेख
औसा - रमेश शिंदे
औसा हे तसे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात परिचित आहे. या शहराला जशी ऐतिहासिक आणि अध्यात्मिक ओळख आहे तशा कांही व्यक्तीनी आपली हि ओळख तयार केली आहे. राजकारण समाजकारण शिक्षण प्रशासन यामध्ये कांही नावे अशी आहेत ते नाव घेतले कि औश्याचे का ? म्हणून समोरचा व्यक्ती विचारतो. अशीच एक ओळख तयार केली आहे ते वैद्यकीय क्षेत्रातील एक उत्कृष्ट प्रशासक आणि तालुका आरोग्य अधिकारी डाँ.आर आर शेख यांनी मागील २५ वर्षे आरोग्य सेवेला वाहून घेतलेल्या या व्यक्तीमत्वाचा आज वाढदिवस.वैद्यकिय शिक्षण घेतल्या नंतर ते एखादे सुसज्ज हाँस्पिटल चालू करु शकले असते पण नेहमीच माणसाच्या गर्दीचा दर्दी आसलेल्या माझ्या या परममिञ डाँ. आर आर शेख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माणसाच्या गर्दीत त्यांचे शंभरापार वाढदिवस व्हावेत आणि ते साजरे करण्याचे भाग्य आम्हाला मिळावे हिच या वाढदिवसा निमित्ताने सदिच्छा.
वैद्यकीय क्षेत्र हे असे आहे कि येथे माणसाच्या जीवन आणि मरणाचा फैसला होतो विशेष म्हणजे डाँक्टरांना देव माणले जाते. आज जरी वैद्यकीय क्षेञाला बाजारु स्वरुप आले असले आणि वैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आसला तरी २५ ! वर्षापूर्वी वैद्यकीय पदवी मिळवलेले डाँक्टर आर.आर.शेख आपले खाजगी हाँस्पिटल उभा करुन खूप मोठा माणूस झालेला पाहिला मिळाले असते.पण सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडलेला हा माणूस २५ वर्षापासून आज हि शासकीय सेवेत आणि माणसाच्या गर्दीतच पाहयला मिळतो आहे.औसा तालुक्यातील हारेगाव हे मुळगाव व औसा हिच आपली कर्मभूमी आसलेले हे व्यक्तीमत्व वडील रसुलसाब शेख हे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत होते विज्ञान हा विषय शिकवणारे एक हाडाचे शिक्षक माझ्या नागरसोगा गावात ते माध्यमिक शिक्षक होते. पण त्यांच्या हाताखाली मला शिकता आले नाही. पण पहिली ते पाचवी च्या वर्गात असताना त्यांना पाहता आले.मी जरी त्यांच्या हाताखाली शिकलो नसलो तरीही आज ते दिसले कि आदराने मान खाली जाते. आशा या शिक्षकाच्या पोटी जन्मलेले हे वैद्यकीय अधिकारी शिक्षकांना जेवढा आदर मिळतो त्या पेक्षा हि जास्त आदर आमचे मिञ डाँ. आर आर शेख यांना समाजात मिळतो हे विशेष.
मागील आठ्ठावीस वर्षापासून पञकारीता करीत असताना मी आणि संजय सगरे जेव्हा हि कधी डाँक्टरांना भेटू तेव्हा त्यांचा एकच विषय असायचा तालुक्यात हे झाले पाहिजे इथे याची गरज आहे. तुम्ही वर्तमानपञात याला प्रसिद्धी द्या मला फोन आले कि मी शासनाकडे प्रस्ताव पाठवतो हे ठरलेले आसायचे त्यामुळेच आज औसा तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंन्द्र आणि उपकेंन्द्राची संख्या अधिक आहे.जेव्हा हि भेटू त्यावेळी विषय ठरलेला असायचा या ठिकाणी हे झाले पाहिजे हे होणे गरजेचे आहे यामुळे सर्वसामान्य लोकांचा कसा फायदा होईल हाच एक ध्यास तालुक्याच्या आरोग्य सेवेचा डाँ.आर आर शेख यांना होता आणि आज हि आहे. औसा तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी म्हणून ते आज हि काम पाहतात.कोविड १९ मध्ये तर औसा तालुक्यातील प्रत्येक गावात भेट देणारा आणि गावातील नागरिकांना आरोग्य सेवेचा फायदा कसा घ्यावा आरोग्य कसे सांभाळावे हे पटवून देणारा हा एकमेव अधिकारी असेल.त्यांच्या या वैद्यकीय सेवेस आणि वाढदिवसास माझ्या व माझ्या परीवारा कडून खूप खूप शुभेच्छा त्यांची कारकिर्द अशीच बहरत जावो हि सदिच्छा.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.