कृषिक मोबाईल ॲपव्दारे खतबचतीची विशेष मोहिम

 


कृषिक मोबाईल ॲपव्दारे

खतबचतीची विशेष मोहिम







          लातूर, दि.4(जिमाका): बारामतीचे कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने विकसित रासायनिक खताच्या शिफारस केलेल्या मात्रा मिळविण्यासाठी कृषिक या मोबाईल ॲपमधील गणक यंत्राचा वापर करुन राज्यात प्रथमच खतबचतीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

          अचुक खत मात्रा  मिळविण्यासाठी फार क्लिप्ट गणिती सुत्रांचा वापर करावा लागतो. शेतकऱ्यांना खत मात्र अगदी सहज सुलभ पध्दतीने कशा मिळतील हे लक्षात घेऊन कृषिक  खत गणकयंत्र विकसित करण्यात आलेले आहे.

          कृषिक गणकयंत्राच्या माध्यमातून संबंधित कृषि विद्यापीठांची शिफारस केलेल्या विविध पिकांसाठी खतमात्रा परिगणित करण्यासाठी कृषिक मोबाईल ॲपचा अवश्यक वापर करा. त्याप्रमाणे खतांचा फायदेशीर पर्याय  निवडा आणि भरघोस उत्पन्न मिळवा.

          शेतकऱ्यांनी अँड्रॉइड मोबाईल फोनमधील गुगल प्ले स्टोअरमध्ये Krushik/ कृषिक सर्च करुन अथवा क्यु आर कोड स्कॅन करुन प्रथम कृषिक ॲप डाऊनलोड करावे व खतबचतीच्या विशेष मोहीमेचा लाभ घ्यावा. असे कृषि विभागाने कळविले आहे.


वृत्त क्र.408                                                                          दिनांक:- 4 जून 2021

*महानगरपालिके मार्फत 45 वर्ष पुढील

वयोगटासाठीचे लसीकरण पाच केंद्रावर होणार*

लातूर,दि.4(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 5 जून 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी  पुढील प्रमाणे आहे. 18 ते 44 वयोगटासाठी  लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आलेले नाही. 45 वर्षे पुढील वयोगटासाठीचे  लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे, अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.

विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर, यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली, लातूर, दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर) व शिवाजी शाळा, लेबर कॉलनी, लातूर येथे कोव्हीशिल्ड लस दिली जाणार आहे.

          45 वर्षावरील नागरीकांचा कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेऊन 84 दिवस पुर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील.) HCW व FLW याचा पहिला व दुसरा डोस. ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील.

           शहरातील  इतर लसीकरण केंद्र दि. 5 जून 2021 रोजी बंद राहतील याची नागरीकांनी नोंद घ्यावी  असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.                                                 

वृत्त क्र.409                                                                       दिनांक:- 4 जून 2021

 

जिल्ह्यात 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण

सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत सुरु राहणार

 

लातूर,दि.4(जिमाका):-लातूर जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 5 जून 2021 रोजीचे वेळापत्रक पुढील पुढील प्रमाणे आहे. 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र- उपजिल्हा रुग्णालय उदगीर, पहिला व दुसरा कोविशिल्ड, ऑनस्पॉट, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड,फक्त दुसरा कोव्हॅक्सीन लस ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय औसा,पहिला व दुसरा कोविशिल्ड, ग्रामीण रुग्णालय चाकूर, पहिला व दुसरा कोविशिल्ड, ग्रामीण रुग्णालय देवणी पहिला व दुसरा कोविशिल्ड  व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट  ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड  ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट व  जिल्हयातील  सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट डोस  सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु राहणार.

45 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध्‍ साठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 5 जून 2021 रोजी कोवीशिल्ड/कोव्हॅक्सीन लसीचे लसीकरण करण्यात येत आहे.

लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. गंगाधर परगे यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.                                                     

वृत्त क्र.410                                                                      दिनांक:- 4 जून 2021

 

समाज माध्यमावर प्रसारित (व्हायरल) झालेल्या चुकीच्या संदेशामुळे उपचार घेतलेल्या कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवाहन

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने संदर्भात जनहित याचिका दाखल असून त्या याचिकेसंदर्भात मा. उच्च न्यायालय द्वारे कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही

समाज माध्यमावरील बनावट संदेश व या योजनेतून वाढीव बिलाची रक्कम परत मिळत असल्याबद्दल कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची दिशाभूल

उच्च न्यायालय किंवा राज्य सरकार कडून यासंदर्भात अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत

लातूर, दि.4(जिमाका):-जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या महामारीबरोबरच लातूर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली व त्याचबरोबर रुग्णांच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे रुग्णांचा हॉस्पिटल मध्ये भरती राहण्याचा कालावधी वाढला. त्यामुळे रुग्णांना बरे होण्याकरिता खूप आर्थिक तरतूद करावी लागली.

      मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने संदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे व त्या याचिकेसंदर्भात मा. उच्च न्यायालय द्वारे कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यातच या योजनेच्या लाभविषयी समाज माध्यमावर बनावट संदेश प्रसारित होऊ लागले आहेत. समाज माध्यमावरील बनावट संदेश व या योजनेतून वाढीव बिलाची रक्कम परत मिळत असल्याबद्दल कोरोणा रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची दिशाभूल झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बिलाची रक्कम परत मिळण्याकरिता अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हाभरातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनावश्यक धाव घेऊ लागली आहेत. तेव्हा जिल्हा आरोग्य प्रशासनाने जनहितास्तव स्पष्टीकरण दिले आहे, अशी माहिती महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉक्टर संजय घटकुल यांनी दिली आहे.

जन आरोग्य योजनेत एकूण 21 रुग्णालय समाविष्ट

     लातूर जिल्ह्यात एकूण 21 रुग्णालय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. यातील 13 खाजगी स्वरूपाची असून त्यातील 9 रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णावरती उपचार करण्यास परवानगी दिलेली आहे. सध्या समाज माध्यमावर उच्च न्यायालयातील जनहित याचिकेचा संदर्भ देऊन चुकीचा संदेश प्रसारित केला जात आहे. उच्च न्यायालय किंवा राज्य सरकार कडून यासंदर्भात अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. योजनेच्या यादीत समावेश असलेल्या रुग्णालयातील बिलाबाबत तक्रार असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर येथे अर्ज करता येतो. त्याचप्रमाणे योजनेतील कोरोना उपचाराकरिता निवडलेल्या रुग्णालयातील आरोग्य मित्रा कडेही विहित नमुन्यात तक्रार करता येते.

 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करून उपचाराकरिता निवडलेली 9 रुग्णालय पुढील प्रमाणे आहेत. 1) अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल लातूर,2) विवेकानंद हॉस्पिटल लातूर,3) यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय लातूर (MIMSR Medical College) 4) देशपांडे हॉस्पिटल लातूर, 5) गायत्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल लातूर, 6) आयकॉन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल लातूर,7) येलाले हॉस्पिटल लातूर,8) लाईफ केअर हॉस्पिटल उदगीर व 9)अश्विनी हॉस्पिटल उदगीर असे आहेत.

***

 

 

वृत्त क्र.411                                                                            दिनांक:- 4 जून 2021

संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे

यांचा लातूर  जिल्हा दौरा 

लातूर,दि.4(जिमाका):-राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे  हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

शनिवार  दि. 5 जून 2021 रोजी सकाळी 6.45 वाजता जागतिक पर्यावरण दिनानिमिम्त महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ लातूर,ग्रीन लातूर वृक्ष टिम व इंडियन मेडीकल असोशिएशन,लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- नवीन बसस्थानक, जुना रेणापूर नाका, लातूर,  सकाळी 7.15  वाजता लातूर येथून मोटारीने मौ. नागराळ ता.देवणीकडे प्रयाण. सकाळी 9.00 वाजता जागतिक पर्यावरण दिनानिमिम्त 20 हजार रोपांच्या वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- मौ. नागराळ ता.देवणी जि.लातूर.

सकाळी 10.00 वाजता देवणी तालुक्यातील कोव्हिड-19 सद्यस्थिती विषयक आढावा बैठक स्थळ:- प्राथमिक आरोग्य केंद्र ,नागराळ ता.देवणी जि.लातूर सकाळी 11.30 वाजता मौ.नागराळ ता.देवणी येथून मोटारीने मौ.दावणगाव ता.उदगीरकडे प्रयाण.सकाळी 11.45 वाजता दिवंगत गुंडेराव माधवराव भंडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट स्थळ:- मौ.दावणगाव ता.उदगीर .

दुपारी 12.00 वाजता मौ.दावणगाव ता.उदगीर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण दुपारी 12.30 वाजता मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्थानिक स्वराज संस्थांच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षिस समारंभ स्थळ:- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, नांदेड रोड,उदगीर दुपारी 2.00 वाजता उदगीर व परिसरातील हवेच्या गुणवत्ता तपासणी प्रकल्पाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ:- गंगनबिडकर कॉम्प्लेक्स,छत्रपती शिवाजी महाराज चौक,उदगीर.

दुपारी 2.20 वाजता राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत ऑनलाईन निवड झालेल्या शेतकऱ्यांना परवाना आणि बियाणे वाटप कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ:-सिध्देश्वर फर्टिलायझर,छत्रपती शिवाजी महाराज चौक,उदगीर.दुपारी 2.40 वाजता हरित वसुंधरा ग्रुप.उदगीरच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ:-सिंचन वसाहत,देगलूर रोड,उदगीर दुपारी 3.00 वाजता दिवंगत वैजनाथ महालिंगअप्पा व्दासे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट स्थळ:- देगलूर रोड,उदगीर दुपारी 3.20 वाजता श्री.राहूल रमेश अंबेसंगे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट स्थळ:- चौबारा रोड,उदगीर

दुपारी 3.40 वाजता दिवंगत लक्ष्मीबाई किरणकुमार बागबंदे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट स्थळ:- पारकट्टी गल्ली,उदगीर.दुपारी 4.00 वाजता शासकीय विश्रामगृह,उदगीर येथे राखीव.

सायं.5.20 वाजता हत्तीबेट मौ.देवर्जन ता.उदगीर येथे वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ:- हत्तीबेट मौ.देवर्जन ता.उदगीर सायं.6.10 वाजता जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 3 हजार रोपांचा वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ:- मौ.भाकसखेडा (पश्चिम) ता.उदगीर व सोईनुसार मौ.भाकसखेडा (पश्चिम) ता.उदगीर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह,उदगीर येथे राखीव व मुक्काम.

                                             ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या