तंबाखूचे धोके सांगणे व सवय सोडण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती मोहिम

 

                                                                         दिनांक:- 1 जून 2021

तंबाखूचे धोके सांगणे व सवय सोडण्यासाठी 

लोकांमध्ये जनजागृती मोहिम

                                                       अप्पर मुख्य सचिव - डॉ. प्रदीप व्यास





       लातूर, दि.1(जिमाका):- आपण कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहोत.  जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने तंबाखू वापरामुळे लोकांना कोविड-19 चा संसर्ग झाल्यास  गंभीर फुफ्फुस आजार, मधुमेह, हृदयरोग, आणि कर्करोग यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वर्तवली आहे तंबाखूचे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दाखवण्यासाठी  आरोग्य विभागाने जनजागृती  चित्रफीत तयार केली असून तिचे प्रसारण करण्यात येणार आहे.

           सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, जागतिक आरोग्य संघटना तसेच व्हायटल स्ट्रॅटिजीज यांच्या तांत्रिक सहाय्याने या जनजागृती मोहीम आखण्यात आली आहे. राष्ट्रीय तंबाखू क्वीट लाईन या मोहिमेची सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. ही मोहीम तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रात जनसंवाद माध्यमांद्वारे तसेच Facebook,  Hotstar, Voot, Zee5, SonyLiv, MX Player यासारख्या मोठ्या डिजिटल ऑनलाईन स्ट्रीमींग प्लॅटफॉर्मवर सुद्धा राबवण्यात येत आहे.

            या जनजागृती मोहिमेचे ऑनलाईन उद्घाटन दि. 31 मे रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  आरोग्य सेवा आणि NHM चे आयुक्त आणि मिशन संचालक डॉ. एन. रामास्वामी, आरोग्यसेवेच्या संचालक डॉ. साधना तायडे,टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथील कर्करोग रोगशास्त्राचे प्रमुख शल्यचिकित्सक आणि उपसंचालक प्रा. डॉ. पंकज चतुर्वेदी, व्हायटल स्ट्रॅटिजीजच्या सहाय्यक वैशाखी मल्लिक उपस्थित होते.

            यावेळी आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास  म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रात तंबाखूचा धोका कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. शासनाने नुकतेच खुल्या सिगारेटच्या विक्रीवर निर्बंध लावण्यासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत, त्यामुळे युवकांकडून होणाऱ्या त्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे. तंबाखूचे धोके सांगणे आणि लोकांना तंबाखू सोडण्यासाठी उद्युक्त करणे यांसाठीचे मास मीडिया मोहिम हे महत्वपूर्ण पाऊल आहे.

             यावेळी, आरोग्य सेवा आणि NHM चे आयुक्त आणि मिशन संचालक डॉ. एन. रामास्वामी म्हणाले, या उपक्रमाचे उद्दिष्ट्य म्हणजे व्हर्च्युअल प्रकारे लोकांपर्यंत पोहोचणे आणि तंबाखूचे आरोग्य धोके आणि तंबाखू सोडण्याचे महत्व यांबद्दल लोकांना संवेदनशील बनवणे हे आहे. 

           आरोग्य  विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे म्हणाल्या, तंबाखू संबंधित कर्करोग हा सहजतेने बचाव केल्या जाणाऱ्यांपैकी एक आहे.  आम्हाला युवा पिढीबद्दल चिंता आहे, जे या देशाचे भविष्य आहेत आणि त्यांना तंबाखू वापराचे हानीकारक परिणामांबद्दल शिकवण्याची गरज आहे त्यासाठीच, आम्ही शाळांना तंबाखू मुक्त करण्यावर कार्य करत आहोत. महाराष्ट्रामध्ये, आम्ही सुमारे 230 हून अधिक शासकीय रूग्णालयांमध्ये तंबाखू सोडण्याविषयी समुपदेशन केले आहे.

          टाटा मेमोरियल सेंटर,मुंबई येथील कर्करोग रोगशास्त्राचे प्रमुख शल्यचिकित्सक आणि उपसंचालक प्रा. डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले, तंबाखू वापराचे आरोग्याचे धोके आणि जोखिम यांबद्दल आपण सातत्याने संदेश देत रहायला हवे जेणेकरून सार्वजनिक शिक्षणाचा सकारात्मक आणि दीर्घकालिन वागणूकीमधील बदलामध्ये परिणाम होऊ शकतो.

              व्हायटल स्ट्रॅटिजीजच्या सहाय्यक संचालक, वैशाखी मल्लिक म्हणाल्या, मास मीडिया मोहिमेची सुरूवात करण्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी आहोत. व्हेन यू क्विट यांसारख्या आरोग्य शिक्षण मोहिमा तंबाखू वापराचे आरोग्य धोके सांगण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

               या जनजागृती मोहिमेची राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग,जिल्ह्याचे आरोग्य विभाग, अधिकारी, कर्मचारी यांच्या सोशल मीडिया हँडल वरूनही जनजागृती केली जाणार आहे.

 

                                                     *****

                 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या