स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही, दोघांना अटक, 4 मोटर सायकल सह 1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*

   *दिनांक: 01/06/2021*


*स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही, दोघांना अटक, 4 मोटर सायकल सह 1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*




लातूर प्रतिनिधी 

                 या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री. हींमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखा, लातूर चे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राम गवारे, राजाभाऊ मस्के ,युसुफ शेख, नितीन कटारे, सचिन धारेकर, नागनाथ जांभळे यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपी नामे

1) करीम अमनजी शेख वय 28 

2) गणी उर्फ सलीम अमन जी शेख 30 

दोघे राहणार-तुंगी,तालुका औसा ( सध्या राहणार झीनत सोसायटी,लातूर) या दोन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लातूर शहर परिसरातून चोरलेल्या एकूण चार हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक

MH 24 Q 6953

MH 24 T 2797

MH 24 T 0175

MH 24 B 4532

ज्यांची किंमत अंदाजे 1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतल्या आहे , या चोरट्यांकडून

1) पोलीस स्टेशन,शिवाजी नगर गुन्हा नंबर 215 /2021 कलम 379 IPC

2) पोलीस स्टेशन शिवाजीनगर गुन्हा नंबर 341 /2020 कलम 379 ipc

 3) गांधी चौक पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 306 /2021 379 IPC

 हे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्हेगारांनी अजून काही वाहने चोरी केली असावीत या संदर्भाने कसून चौकशी सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या