ज्येष्ठ उर्दू कवी एजाज अहमद यांचा सत्कार
सोलापूर्- सोशल हायस्कूल व ज्यू कॉलेज चे निवृत प्राचार्य , महाराष्ट्राचे ज्येष्ठ उर्दू कवी , " बरगे_हिना '' या
सुप्रसिद्ध काव्य संग्रहाचे लेखक व "शिकवा जवाबे शिकवा " अल्लामा इक्बाल यांच्या काव्यवर आधारित दूरदर्शन व आकाशवाणी वर रंगतदार कार्यक्रम सादर करुन सोलापुर चा नांव राष्ट्रभात पोहचविणारे एजाज नबी कारीगर उर्फ "एजाज अहमद एजाज" यांच्या उर्दू साहित्यावर नुकतेच यास्मीन याकूब शेख या विद्यार्थीनीं नीं "एजाज अहमद अपने हम-असर शोअरा के तनाजूर मे " हया विषयावर आपला प्रबंध पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळ कर विद्यापीठ मध्ये सादर करुन पीएचडी पदवी मिळविली आहे. त्या निमित्त कारीगर यांच्या शाल-हार, पुस्तके देवून त्यांच्या उर्दू मराठी साहित्य परिषदच्या वती ने सत्कार करण्यात आला
सोलापूर मध्ये एका उर्दू कवी वर प्रबंध सदर करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे आणी हा मान ज्येष्ठ कवी एजाज नबी कारीगर सर यांनां मिळाला हा सन्मान फक्त एजाज नबी यांचा नसून सोलापूरातील सर्व कवी व साहित्यकांचा सन्मान आहे असे मत उर्दू मराठी साहित्य परिषदचे अय्यूब नल्लामंदू यांनी सत्कारा प्रसंगी व्यक्त केले,
या वेळी मजहर अल्लोळी , जाफर बांगी, इर्फान कारीगर उपस्थित होते.
एजाज नबी कारीगर सर सत्काराला उत्तर देत म्हणाले - मी भाग्यवान आहे माझ्या समस्त साहित्य व शायरीवर माझ्या हयातीत यास्मीन याकूब शेख ह्या विद्यार्थीनीं अथक पारिश्रम घेत पीएचडी पदवी मिळविली याचे मार्गदर्शक प्रा. डाॅ गौस शेख प्राचार्य इ जा तांबोळी यांनी ही फार मोलाचे सहकार्य केले, याबदल उर्दू मराठी साहित्य परिषदे तर्के त्यांचे ही अभिनंदन करण्यात आले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.