एम. आय. एम. प्रमुख
सययद मुजफ्फरअली इनामदार
एक प्रामाणिक नेतृत्त्व !
औसा एम. आय. एम. प्रमुख मा. सय्यद मुजफ्फारअली इनामदार यांचा सामाजिक राजकीय कार्याचा जेष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी यांनी घेतलेला वेध येथे देत आहोत.
संपादक
कांही व्याक्तींची ओळख कार्यकरणे हिच असते समाजकारणाकडे पत्रकार या त्रयस्थ दृष्टीने पाहता असंख्य कार्यकर्ते पक्षाचा वापर स्वतःस करताना दिसून येतात. पक्षाने मला काय दिले न पेक्षा मी समाजाला काय देवू शकतो. फक्त सामाजकार्य नि पक्षाला संघटनात्मक पध्दतीने मोठे करण्यात जेष्ठ कार्यकर्ते एम. आय. एम. प्रमुख मा. सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांचे नांव वरच्यास्थानी अग्रकमाने घ्यावे लागेल.
राजकारण करतांना समाजातील उपेक्षीतांच्या प्रश्नांची तसेच नागरी आणि विकास विषयक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करुन चालत नाही तर ते प्रयत्न प्रामाणिक असावे लागते. राजकारण स्थानिक असो वा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विविध घडमोडीचे प्रतिबिंब सदर नेतृत्त्व कार्यकर्तृत्वामध्ये पडत असते याला अपवाद इनामदारही त्याला अपवाद नाहीत. जगत्जेता कथीत अमेरीकेपासुन जगात घडणाऱ्या अनुकुल किंवा प्रतिकुल घडामोडीच्या प्रवाहात केवळ माणूसपणाच्या भूमिकेत इनामदार राहिले आहेत. एखाद्या माणसाच्या परिश्रमामधुन संस्था, संघटना नावारुपाला येते. त्यांच्या कार्यकतृत्वामुळे चोहोकडे प्रकाश निर्माण होतो. जे आपले डोळे दिपले जातात आळशी माणसालाही स्फुर्ती येते. जांभळाच्या झाडाखाली झोपलेल्या माणसाची गोष्ट सर्वश्रुत आहे. त्यातून बोध का घ्यायचा तो सुज्ञ माणसे घेतलीतच संस्था संघटनात्मक कार्य एखाद्याला जमले म्हणून इतरानांही शक्य होत नसते. नकल से सावधान माध्यमात जाहिरात असते. तसे लोक असली नकली ओळखून असतात. सावधान, सावधान, नकलसे सावधान इनामदार कोणत्या पदावर असतील वा नसतील मात्र त्यांचे धडाडीचे कार्यकर्ते हे प्रमुख पद कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. कार्यतत्परता, सावधानता इनामदार यांचेकडे आहे. शहरध्यक्ष पदाच्या सुमारे बारा वर्षाच्या कार्याचा विस्तृत आढावा येथे घेता येणे शक्य नाही. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्तृत्त्वाची थोडक्यात मांडणी करणे आवश्यक ठरते. इनामदार यांनी हैद्राबादच्या अनोळखी पक्षाला औशात आणले. नवीन पिढीला हा पक्ष नवाच म्हणता येईल. इनामदार यांचे नाव उच्चारताच समाजातील अपप्रवृत्तीला घाम फुटत असे. त्यांनी आपल्या कामातून धाक धरारा निर्माण केला. शुन्यातून विश्व निर्माण केले. मराठवाडा विभागात संघटनात्मक कार्य उभे केले. त्यांच्याकडे संघटन कौशल्यासह कार्यकत्यांची मने जोडण्याची कला आहे. विरोधकावर वेळीच प्रहार करण्याची क्षमता आहे..
1948 मध्ये निजाम राजवट बरखास्त झाली. तत्कालीन केंद्रसरकारच्या आदेशान्वये हैद्राबाद • संस्थानवर पोलीस अॅक्शन नामक कार्यवाही झाली. या कार्यवाह्यांतर्गत दुसरी दुखद बाजु लोकांसमोर आलीच नाही. म्हणजे या कारवाईमुळे मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाचे मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असा निष्कर्ष न्या. सुंदरलाल यांच्या कमीटीने काढला. स्वातंत्र्यानंतर या अहवालावर केंद्रातील कोणत्याही पक्षाच्या सरकारला अंमलबजावणी करुन न्याय द्यावा असे वाटले नाही. याबाबत इनामदार सतत आश्चर्य व्यक्त करतात. सामाजिक प्रश्नांतर्गत अल्पसंख्यांकाचे प्रश्न असो की, हिंदु समुदायाचे माणुस सारा एक त्यांच्या हितार्थ आम्ही सदैव तत्पर हीच भूमीका ईनामदार यांची राहिली आहे. एम. आय. एम. मुलतः समाजसेवेचा वसा घेत स्थापन झालेला पक्ष तो मुळ उपदेश समोर ठेवून वाटचाल गतीशिल केलेली आहे. प्रत्येक तालुक्यासाठी अल्पसंख्यांक कल्याण समीतीची स्थापना करण्यात यावी. एम. आय. एम. चा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करुन त्यानिमित्ताने सामाजिक बांधीलकी सिध्द केली. केवळ निवडणुका जिंकणे नव्हते तर लोकांची मने जिंकण्यासाठी सदैव कार्यतत्पर असतात. 18 डिसेंबर अल्पसंख्यांक दिवस म्हणून साजरा करणेसाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे यशही मिळाले. 6 डिसेंबर बाबरी मस्जीद उध्दस्त काळा दिवस, राज्य एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या न्याय मागण्याला पाठींबा दिला, पावसाळ्याच्या दिवसात औसा शहरवासियांचे आरोग्य अबाधीत राहावे म्हणून औसा न.प. कडे दक्षता घेणेबाबत सल्ला दिला, मौ. आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून मुस्लीम तरुणांना उद्योगासाठी अर्थसहाय्य वाटपाची मागणी लावून धरली. गतवर्षात हवामान विभागाचा अंदाज चुक ठरला म्हणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केली. शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून मागणी लावून धरली. जनधन खाते उघडणे व रेशनकार्ड सुलभ मिळावे म्हणून पाठपुरावा केला. नोटबंदीच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यांना सोयाबीनचे अनुदान मिळणेबाबत मागणी केली. शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबत वेळोवेळी नगरपरीषदेवर धरणे आंदोलने केली. समाधानकारक पावसाअभावी मागील वर्षात शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडल्यामुळे शासनाने दुष्काळ जाहिर करुन त्यांना अर्थसहाय्य करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. रमजान ईद हा पवित्र सण साजरा करण्यासाठी न.प. कर्मचारी कामगारांना या सनापूर्वीच वेतन देण्यात यावे या मागणीला यश आले. मालेगाव बॉम्बस्फोटात क्षतीग्रस्तांना अर्थसहाय्य करण्याची मागणी केली. औशाला तेरणा प्रकल्पामधु पिण्याचे पाणी पुरवठा करण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आली. इस्लाम धर्माविषयी अवमानकारक पोस्ट टाकलेबाबत तसेच अल्पसंख्यांक पोलीस शिपाई यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. शहर व परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त एमआयएम च्या मागणीमुळेच झाला. किती म्हणून प्रश्नांची सोडवणुक करावी एखाद्या झपाटलेल्या जादुगरासारखे काम करावे याचे आश्चर्य वाटते.
एम. आय. एम. ला गोरगरीबांच्या झोपडीपर्यंत नेऊन त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीचे इमाने इतबारे इनामदार यांनी केले. प्रस्थापितांचे सिहांसने भूकंपाप्रमाणे हलली. प्रचंड जनआंदोलने केली त्यांच्यापासुन कांही जणांना स्फुर्ती उत्साह संचारला. उत्साह हा कायम टिकवणे कठीण असते. 'जावे त्याच्या वंशा कळे' एमआयएम च्या माध्यमातून इनामदार यांचे समाजकार्य पक्षाला उन्नीतीकडे घेऊन जाणारे ठरत आहेत. कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या कामातून मोठा होत असतो. पक्ष आहे संघटना कार्य नसेल तर अनर्थ घडतो. चालकाविना गाडी धावणार नाही हे लक्षात घेता इनामदार यांचे समाजसेवेची गाडी सुसाट एक्सप्रेस धावत आहे. या गाडीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांच्या प्राधान्यांसह हिंदु समाजाच्या सण उत्सव साजरे करण्यासाठी स्थानिक संस्था वा शासनाने आवश्यक सहकार्य करणेबाबत इनामदार आग्रही असतात. दोघांच्याही विकास समन्वय सलोखा आणि बंधुभावनेतून एक नवा समाज घडवूया.
इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या त्यांना सहस्त्रावधी मनःपूर्वक शुभेच्छा
विलास कुलकर्णी,
वरिष्ठ पत्रकार, औसा. मो. नं. 9552197268.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.