आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वार्ड आणि गाव पातळीवर पक्षबांधणी सुरू करावी.

 

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाचा

आराखडा तयार करुन त्यावर अंमलबजावणी करा

लातूर जिल्हा, तालुका व शहर काँग्रेस पदाधिकाऱ्‍यांच्या

बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख यांची सूचना

संयुक्त बैठक घेऊन वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला








लातूर प्रतिनिधी अज़ीज़ शेख 

·         आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वार्ड आणि गाव पातळीवर पक्षबांधणी सुरू करावी.

·         येणारी प्रत्येक निवडणूक स्वबळावर





लढण्याचा विचार प्रदेशाध्यक्षांनी बोलून दाखवला आहे. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यादृष्टीने तयारी ठेवावी.

·         प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतःला उमेदवारी मिळणार आहे आहे, असे गृहीत धरून पक्ष कार्यात झोकून द्यावे.

·         पक्ष कार्यात सक्रिय राहणे शक्य नाही अशा पदाधिकाऱ्यांनी इतर इच्छुकांसाठी  आपली जागा रिक्त करून समर्थकांची भूमिका बजावावी

·         पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांचे पक्ष कार्याचे अहवाल पाहूनच पुढील संधी मिळणार आहेत याची जाणीव ठेवावी.

·         बूथ पातळीवरील कार्यच सर्वाधिक दखलपात्र राहणार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी मतदारांची नावे नोंदविणे, छायाचित्र नसलेल्या मतदारांची छायाचित्रे जमा करणे यासारख्या कामावर लक्ष केंद्रित करावे

·         राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राबवण्याचे येत असलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत   पोहचवावी.

लातूर प्रतिनिधी (शनीवार दि. २५ जून २१)

  साधारणतयेत्या उन्हाळ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था  सहकार क्षेत्राच्या निवडणुका होण्याची शक्यत आहे़ त्यामुळे लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षतालुकाध्यक्षशहराध्यक्ष  विविध सेलच्या पदाधिकाऱ्‍यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाचा आराखडा तयार करुन त्यावर अंमलबजावणी करावीअशी सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षणसांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली़ आहे. 

  येथील काँग्रेस भवन येथे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षतालुकाध्यक्षशहराध्यक्ष  विविध सेलचे पदाधिकारी यांची बैठक दि़. २६ जून रोजी दुपारी घेतली़ त्याप्रसंगी त्यांनी पक्षाचा विस्तार  पक्ष अधिक मजबुत करण्याच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या. या बैठकीस लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुखकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगेलातूर श्‍हर जिल्हाध्यक्ष अॅड़. किरण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती़. 

  आगामी काळातील निवडणूक आपल्याला स्वबळावर लढायची आहे हे गृहीत धरुन काँगे्रस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावेअसे नमुद करुन पालकमंत्री अमित विलासराव देशामुख म्हणालेआपल्याला आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका केवळ लढावयाच्या नाहीत तर त्या जिंकायच्या आहेत ही खूनगाठ बांधून पक्ष संघटन कार्यास लागावेआपल्या बूथपासून वार्डप्रभागशहरतालुका  जिल्हा कमिटीस्तरावर कार्य करताना प्रत्येक पदाधिकाऱ्‍यांनी पक्ष वाढीसाठी आणखी नवीन काय करता येईल यासाठी प्रयत्न करावा़ लातूर काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो आता येणाºया स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अबाधित राखण्यासाठी जोमाने पक्ष वाढीचे कार्य करावेप्रत्येक मतदारापर्यंत आपल्या पक्षाने केलेल्या कामाची माहिती द्यावीकाँग्रेस भवन या ठिकाणी वॉर रुम तयार करुन जनतेची कामे मार्गी लावावीतबूथ लेव्हलवर कार्यकर्त्यांची फळी तयार करावीआगामी काळातील निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कोणत्या निवडणुका कधी लागणार याचा प्रथम अभ्यास करावापक्षातल्या फ्रंटल सेल पक्ष पदाधिकाºयांनी संघटनात्मक बांधणी करावी़. येणाऱ्‍या काळात परत लॉकडाऊन झाले तर आपल्याला प्रत्यक्ष पक्षवाढीचे कार्य करता येणार नाही अशावेळी ऑनलाईन बैठकझूम मिटिंग सोशल मीडिया माध्यमातून मतदार संपर्क करुन कार्य करावेमतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो संकलित करुन यादी अपडेट करण्याच्या कामात निवडणूक विभागाला सहकार्य करावे़ येणाऱ्‍या  काळात पदाधिकाऱ्‍यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याचा दर पंधरा दिवसाला आढावा घेण्यात यावापक्ष बांधणीचे कार्य करताना कोविड-१९ प्रादुर्भाव  यासाठी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन करावे, आशा सूचना पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी या बैठकीतील उपस्थित पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्‍यांना केल्यापक्षाचे पदाधिकाऱ्‍यांना हवे ते पाठबळ मिळेलअशी ग्वाहीही पालकमंत्री ना.अमित देशमुख यांनी दिली़ तत्पुर्वी पालकमंत्री अमित देशमुख यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराज  विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले़. तसेच ना. देशमुख यांनी यावेळी काँग्रेस पक्षाच्या त्याग आणि बलिदानाच्या परंपरेला अनुसरून कार्यकर्त्यांनी कोरोना महामारीच्या काळात केलेल्या जनसेवेच्या कामाचे यावेळी कौतुक केले. लातूर शहर जिल्हा काँग्रेसने कोरोना बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आरंभलेला अन्नदान यज्ञ रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन लातूर जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराच राज्य आणि केंद्र पातळीवर पक्षाने नोंद घेतली असल्याचे यावेळी सांगितले.

   यावेळी बोलताना आमदार धीरज देशमुख म्हणाले कीआगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सध्याची कोविड१९ प्रदुर्भाव लक्षात घेत ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत पक्ष संघटन  पक्ष बांधणी सुरु करावी लागेल़ मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणेपक्षाने मागील काळात विद्यमान सरकारच्या माध्यमातून नागरिकांसाठी राबविलेल्या योजनाकोविड-१९ लसीकरण वाढविण्यासाठी पक्ष पदाधीकाºयांनी पुढाकार घेण्याची गरज आहेमतदारांचे निवडणूक ओळखपत्रमतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र संकलित करुन निवडणूक विभागाकडे जमा करावीत जेणेकरुन मतदार यादीतून विना छायाचित्र नावे वगळली जाणार नाहीत आशा सूचना केल्या.

  या बैठकीत लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगेलातूर शहर जिल्हाध्यक्ष अॅड़ किरण जाधवलातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडकेउदगीर तालुकाध्यक्ष कल्याण पाटीलशहराध्यक्ष मंजूरखॉ पठाणजळकोट तालुकाध्यक्ष मारोती पांडेशहराध्यक्ष महेश धुळशेट्टेरेणापूर तालुकाध्यक्ष ॅड़ प्रमोद जाधवशहराध्यक्ष मतीनअली सय्यदअहमदपूर तालुकाध्यक्ष अॅड़  हेमंत पाटीलशहराध्यक्ष विकास महाजनदेवणी तालुकाध्यक्ष अर्जुन बेलकोनेऔसा शहराध्यक्ष शकील शेख यांनी बोलताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळऊन देण्यासाठी कामाला लागू असा विश्वास व्यक्त केलाबैठकीस महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सूनिता अरळीकरमहिला काँग्रेसच्या लातूर शहराध्यक्षा प्रा़ डॉ़ स्मिता खानापूरेविलास पाटीलसलमान पठाणप्रा़ प्रविण कांबळेदत्ता सोमवंशीरमेश सूर्यवंशीसुरेश चव्हाणनेताजी बादाडेअॅड़ फारुक शेखशरद देशमुखसूपर्ण जगतापराम चामेविकास मानेगौस गोलंदाजविजय निटूरेप्रा़ एकनाथ पाटीलशेख हुसेनअशोक कोरेआबासाहेब पाटील उजेडकरअॅड़ जहांगीर कलिमोद्दिनमोहन सूरवसेज्ञानेश्वर सागावे आदी पदाधिकारी उपस्थित होते़ अॅड़  बाबासाहेब गायकवाड यांनी आभार मानले़

--------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या