राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे मूर्तिमंत आदर्श-धनंजय मुंडे
*लातूर येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले शाहू महाराजांना अभिवादन
लातूर, दि.26(जिमाका):- लोककल्याणकारी लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या कार्य कर्तृत्वाची प्रेरणा पिढ्यान पिढ्या ऊर्जा व सामाजिक जाणिव देत राहील, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथील सामाजिक न्याय भवन येथे राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी त्यांनी उपस्थितांना सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी लातूरचे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त दिलीप राठोड, जात पडताळणी उपायुक्त अनिल शेंदारकर, सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकूर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, संशोधन अधिकारी सत्येंद्र औलवार यांसह समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर सामाजिक न्याय भवनाच्या आवारात श्री. मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
****
वृत्त क्र.543
माहिती कार्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
लातूर, दि.26(जिमाका):- जिल्हा व विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस साहित्यिक विवेक सौताडेकर व प्रा.शिवशंकर पटवारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, अशोक मालगे, दिलीप वाठोरे, अहमद बेग, अशोक बोर्डे, प्रवीण बिदरकर,कलीम शेख, श्री. केंद्रे, पत्रकार राजकुमार गुडापे,अमोल घायाळ यांनीही शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
वृत्त क्र.544 दिनांक:-26 जून 2021
जिल्ह्यात 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण
सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत सुरु राहणार
लातूर,दि.26(जिमाका):-लातूर जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 27 जून 2021 रोजीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे.
उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड ऑनस्पॉट,ग्रामीण रुग्णालय औसा,पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय देवणी पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला व दुसरा डोस ऑनस्पॉट,ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट,ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट,ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट व जिल्हयातील सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट डोस सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु राहणार.
18 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध् साठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 27 जून 2021 रोजी कोवीशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात येत आहे.
लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
वृत्त क्र.545 दिनांक:-26 जून 2021
*महानगरपालिके मार्फत 18 ते 44 व 45 वर्ष पुढील
वयोगटासाठीचे लसीकरण 7 केंद्रावर होणार*
18 ते 44 वर्षे वयोगटातील पहिल्या डोससाठी 50 टक्के ऑनलाईन
व 50 टक्के ऑनस्पॉट लसीकरण
लातूर,दि.26(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 27 जून 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी पुढील प्रमाणे आहे. 18 ते 44 व 45 वर्षे पुढील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे. नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील, कोविशिल्ड लस उपलब्ध् नाही. त्यामुळे 18 ते 44 वर्षे व 45 वर्षापुढील वयोगटातील नागरीकांना पहिला डोस उद्या दिला जाणार नाही, अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.
विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर,दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर), विवेकानंद प्रा.विदयामंदिर (शिवाजी शाळा प्रांगण),लेबर कॉलनी लातूर,यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली, लातूर, प्रा.ना.आरोग्य केंद्र,राजीव नगर, विवेकानंद चौक लातूर व प्रा.ना.आरोग्य केंद्र,मंठाळे नगर, (मनपा शाळा क्र.09) येथे कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे.
कोव्हॅक्सीन 18 ते 44 वयोगट फक्त दूसरा डोस (पहिला डोस घेवून 28 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील ) व 45 वर्षे वरील वयोगट फक्त दुसरा डोस 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील.कोविड-19 लसीकरण संदर्भात काही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास मनपा हेल्पलाईन क्र. 9158632333 यांचेशी संपर्क करावा असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
******
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.