सोशल एज्यूकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मुस्लिम आरक्षण आंदोलन सुरूवात साठी एक युवक,एक पोस्टकार्ड मोहीम राबविण्यात आली.
(लातूर रिपोर्टर विशेष रिपोर्ट-औसा) सकल मुस्लिम युवक,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज गुरुवार, 17 जून 2021 पासून मुस्लिम आरक्षण आंदोलनला सुरूवात करण्यात आली.यात पहिल्या टप्प्याचा उद्देश:मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर जनजागृती.घराघरात मुस्लिम आरक्षण प्रश्नांच गांभीर्य निर्माण करणे.तसेच आज पहिला टप्पा-मुख्यमंत्र्यांना एक युवक,एक पोस्टकार्ड मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेची सुरूवात लातूर जिल्ह्यातून ही करण्यात आली.यात औसा येथील सोशल एज्यूकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने पहिला पोस्टकार्ड सोसायटीच्या वतीने अड.इकबाल शेख यांनी पोष्ट कार्ड पोष्ट करून केली.सोबत कोषाध्यक्ष मज़हरोद्दीन पटेल यांनी ही या मोहिमेची सुरूवात करत आहोत असे जाहिर केले.यावेळी सचिव इंजि.अजहरउल्ला हाश्मी,अध्यक्ष प्रा.लईकोद्दीन पटेल,डा.जिलानी पटेल,मुज्जकीर काज़ी,अक्रम खान,हुसेन पटेल यांनी ही या उपक्रमात सहभाग होण्याचे आवाहन केले.सकल मुस्लिम युवक महाराष्ट्रचा वतीने खालील मागण्या : १) मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा.२)मॉबलिंचिंग केलेल्या मोहसीन शेखला न्याय देण्यात यावा, मॉब लिंचिंग विरुद्ध कायदा तयार करावा.३) प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारण्यात यावे.४) मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करण्यात यावी. ५) राज्यातील वक्फ जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावेत आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच बळकटीकरण करण्यात यावं.वक्फ संपत्तीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.६) बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर मुस्लिम मुला-मुलींना यूपीएससी, एमपीएससीसाठी संस्था स्थापन करण्यात यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क 9518586155,8600391593,7972677680,8484958484,97650 76648.लढा असेल सर्व पक्षीय,सर्व समावेशक,नियोजनबद्ध आणि शेवटपर्यंतचा.आपल्यासाठी समाज अंतिम आहे,समाजाच्या प्रश्नांसाठी लढणं आमचं कर्तव्य आहे.सकल मुस्लिम युवक, महाराष्ट्र सर्व युवकांना ह्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.