*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त*
*जमियत उलमा-ए-हिंद तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*
सोलापूर (जि.प्र.गुफरान ईनामदार ) दि.५/६/२०२१-आज पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जमियत उलमा- ए- हिंद तर्फे सिद्धेश्वर पेठ,रहमतबी टेकडी येथील हाँस्पिटलच्या क्रिडांगणात जमियतचे उपाध्यक्ष मौलाना हारिस, हाफिज चाँदा यांच्या हस्ते व नगरसेविका फिरदोस पटेल ,नगरसेविका परविन ईनामदार ,माजी महापौर आरिफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. या परिसरात जवळपास 100 ते 150 रोपे लावण्यात येवून त्याचा संगोपन करण्यात येणार आहेत. यावेळी सर्वांनी या रोपांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी मौलाना हारिस यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, प्रेषित मोहम्मद पैगंबर (स्व.) यांचा आदेश आहे, सर्वांनी पाण्याची बचत केली पाहिजे जर तुम्ही एखाद्या नदीच्या बाजूला असाल तरी सुद्धा वुजू करताना पाण्याची आवश्यकता आहे, तेवढ्याच पाण्याचा उपयोग करावा. वृक्षारोपण करण्यासंबंधी प्रेषित मोहम्मद (स.)यांनी दीड हजार वर्ष अगोदरच सांगितले की जो कोणी एक वृक्ष लावेल त्या वृक्षाद्वारे कोणत्याही सजीवांना त्याचा जो फायदा होईल, जोपर्यंत ते वृक्ष राहील तोपर्यंत त्याचे पुण्य वृक्ष लावणार्याला होईल.
जिल्ह्यातील सर्व जमियतच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी किमान एक रोप लावावे आणि त्यांची निगा राखून संगोपन करावे असे आवाहन
यावेळी जमियतचे जिल्हा सरचिटणीस हसीब नदाफ यांनी केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण ,रफिक ईनामदार डॉ. समरीन मुजावर ,डॉ.आसिफ मुजावर, युसुफ प्यारे, हाजी मुश्ताक ईनामदार,हाजी अ.रशिद आळंदकर, हाफिज युसुफ ,अ.मजिद गदवाल, युनुस डोणगावकर,दाऊद मुर्शद, रहिम सर, वसीम सर,युनूसभाई शेख आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.