लातूर के्रडाईतर्फे लातूर टॉकर्स पहिल्य वेबीनारचे आयोजन
सर्व पाहुण्यांची ओळख क्रेडाईचे अध्यक्ष सुबोध बेळंबे यांनी करून देवून या वेबीनार आयोजना बाबतची भुमिका विषद केली. महाराष्ट्रातील क्रेडाईच्या कामाचे मुल्यमापन व शहरांच्या विकासासाठी क्रेडाईचे योगदान या संदर्भात सुनिल फुर्डे यांनी भुमिका व्यक्त केली. या वेबीनारमध्ये टीडीआरची निर्मिती, उपयोग आणि रूपांतर तसेच रिअल इस्टेटबद्दलची महत्वाची माहिती यावेळी उपस्थितीत पाहुण्यांनी विषद केली. या वेबीनारमध्ये महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनी क्लिन अँड ग्रीन लातूरसाठी काम करण्याचे आव्हान केले. तसेच शहराच्या विकासासाठी व विविध प्रकल्पाच्या विकासासाठी व रेनवॉटर हार्वेस्टरसाठी काम करण्यासाठी पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी उपस्थित सभासदांसोबत आयुक्तांनी सकारात्मक चर्चा करून या वेबीनारच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे आव्हान करून कोरोनाच्या संकटानंतर ठप्प झालेली अर्थव्यवस्था नजीकच्या काळात कशी सुरळीतपणे पार पाडेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष उदय पाटील या वेबीनारमध्ये उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचे व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच संतोष हत्ते व विष्णु मदने यांनी शॉर्ट नोटीसवर वेबीनारच्या आयोजनाची व्यवस्था केल्याबद्दल सर्वांनी विशेष आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.