आक्का फाउंडेशन तर्फे "भाजपा युमोचा सन्मान"
लातूर: भाजपा नेत्या तथा माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर उर्फ आक्का यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अक्का फाउंडेशनच्यावतीने भाजपायुमोने कोरोना काळात केलेल्या नेत्रदीपक कार्याबद्दल
लातूरातील कार्निवल रिसॉर्ट येथील कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सह आयुक्त जी. श्रीकांत, लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्याहस्ते भाजपा युवा मोर्चाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांना भाजपा युवा मोर्चा टीमसोबत सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.
कोणाच्या काळात भाजपायुमोने कै. नागनाथअण्णा निडवदे यांच्या स्मरणार्थ अटल अन्नसेवा सुरू केली असून या सेवेच्या माध्यमातून आजपर्यंत ११००० टीफीनचे वाटप करण्यात आले. कोविड-१९ हेल्पलाइनच्या माध्यमातून अनेक रूग्णाला मदत केली तसेच रुग्णांना ऑक्सीजन सेवा घरपोच देण्याचा उपक्रमही राबविण्यात आला. त्यांच्या या कामाची दखल घेऊन अक्का फाउंडेशनच्यावतीने भाजपायुमो टीमचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाअध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र बोकन, सरचिटणीस अँड गणेश गोजमगुंडे, सागर घोडके,आकाश बजाज, संतोष तिवारी, राजेश पवार, महादेव पिटले, राजेश्री होणाळे, आकाश पिटले,अँड पंकज देशपांडे,योगेश गंगणे, यशवंत कदम आदी उपस्थित होते.तसेच भाजपा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा युवा मोर्चाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे लातूर शहर व परिसरातून कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.