*पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर*
*प्रेस नोट*
*दिनांक 05/06/2021*
*वृद्ध महिलेच्या खुनातील आरोपींना निलंगा पोलिसांकडून अटक.*
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की , दिनांक 04/06/2021 रोजी उमरगा हादगा येथील महिला श्रीमती रुख्मिणीबाई राजाराम माने ही मयत झाली आहे. अशी माहिती मिळल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत पोलीस उपनिरी क्षीरसागर व निलंगा येथील स्टाफ घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय निलंगा येथे दाखल करण्यात आला होता.सदर घटनेबाबत अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल करण्यात आला होता.मृतक महिलेचे शवविच्छेदन अहवाल वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्याने व सदरचा मृत्यू हा अनैसर्गिक असल्याचे प्राथमिकरित्या स्पष्ट झाल्याने मृतक महिलेचा मुलगा शिवाजी माने यांची तक्रार घेऊन निलंगा येथे गुन्हा क्रमांक 147/21 कलम 302,34 दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता मृतकाची सुन व नातु यांनी संगनमत करुन, फिर्यादी पती स्वतःच्या आईकडे लक्ष देताना पत्नी व मुलगा यांच्यावर पुरेसे पैसे खर्च करत नाही, व वारंवार त्रास देतात, हा राग मानत धरून मृतकास मारहाण केली,त्यात तिचा मृत्यू झाला.आरोपितांना त्यांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता, आरोपी गणेश माने व ललिता माने यांनी संगनमत करून घरगुती वादातून खून केल्याचे कबूल केले . सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर हे करीत आहेत.
सदर गुन्ह्याची उकल करण्याकरिता मा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे.अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. पोलीस स्टेशन चे आरोपी शोध कामी व तपास कामी तयार करण्यात आलेल्या पथकामध्य सपोनि सावंत, पो उपनि क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस अमलदार सूर्यवंशी, कोहाळे, चव्हाण,महानोर ,शिंदालकर महिला पोलीस अमलदार येलगटटे यांचा समावेश होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.