*स्थानिक गुन्हे शाखा पोस्टे मुरुड गातेगाव एकत्रित कामगिरी,

 *पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर*



                       *प्रेस नोट*


              *दिनांक 05/06/2021*


                 *स्थानिक गुन्हे शाखा पोस्टे मुरुड गातेगाव एकत्रित कामगिरी, 3 घरफोडीच्या गुन्ह्याची उकल. 82,490/- रुपयांचा मुद्देमाल,जप्त 01 आरोपीस अटक.*


                    या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस ठाणे गातेगाव हद्दीमध्ये घडलेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्या करिता पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी,औसा श्री. राजीव नवले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे गातेगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांचे नेतृत्वात पथके तयार करण्यात आले होते.

               पोलीस ठाणे गातेगाव हद्दीमध्ये घडलेल्या दोन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे-

बप्पा श्रीपती काळे, वय 50 वर्ष, रा. पळसप पारधी पिढी, ता. जिल्हा उस्मानाबाद. यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने इतर साथीदाराच्या मार्फत पोलीस ठाणे गातेगाव हद्दीमध्ये दोन घरफोड्या तसेच पोलीस ठाणे पांगरी, जिल्हा उस्मानाबाद येथे एक घरफोडी करून माल चोरला आहे असे सांगितले.

                  नमूद आरोपीकडून घरफोड्या मध्ये चोरी केलेला माल खालील प्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे.

1) पोलीस ठाणे गातेगाव 77/2021 कलम. 461,380 भादवि मध्ये एकूण 14,900 रुपयाचा किराणामाल.


2) पोलीस ठाणे गातेगाव गुरनं 76/2021 कलम. 457,380 भादवि मध्ये ज्वारीचे एकूण चार कट्टे किंमत 6000/- रुपये.


3) पोलीस ठाणे पांगरी, जिल्हा उस्मानाबाद गुरनं 106/2021 कलम. 461, 380 भादवि मध्ये 17 सोयाबीन बियाण्याचे बॅग किंमत 61,580/- 

असा एकूण 82,490/- रुपयाचा मुद्देमाल नमूद आरोपीचे ताब्यातून जप्त करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

                  सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक,गातेगाव श्री.विलास नवले, पालघर पोलीस निरीक्षक मुरुड श्री डोने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे ,राम हरी भोसले ,प्रकाश भोसले, भीष्मानंद साखरे ,प्रमोद तरडे ,नागनाथ जांभळे, पोलीस ठाणे गातेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर कांबळे ,पोलीस अंमलदार जीवन राजगीरकर ,पांडुरंग दाडगे, मदन मुळे ,विनोद गोमारे, पोलीस स्टेशन मुरुड येथील पोलीस अंमलदार रतन शेख, अतुल पतंगे, सुधीर साळुंके, यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या