संजय राजुळे यांना माणुसकीचे दर्शन पुरस्काराने सन्मानित

 

संजय राजुळे यांना माणुसकीचे दर्शन पुरस्काराने सन्मानित






लातूर ः विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र द्वारे आयोजित सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना दि.28 जुन रोजी न्यू.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इन्स्टिट्यूट हॉल उद्योग भवन, लातूर येथे माणुसकीचे दर्शन पुरस्कार - 2021 कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी लातूरच्या शिक्षणाधिकारी मा.तृप्ती अंधारे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थानी विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चेतन अरविंद घोडके(पाटील) हे होते. याप्रसंगी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेणारे तसेच नाविण्यपुर्ण उपक्रमाद्वारे नेहमीच समाजीक क्षेत्रात कार्य करणारे तसेच गेल्या दिड ते दोन वर्षापासुन कोरोनाच्या संकटामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटणारे सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांचा शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या हस्ते माणूसकीचे दर्शन पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बसव सेवा संघाचे अध्यक्ष मा.बालाजीअप्पा पिंपळे, जितेंद्र सराफ हे उपस्थित होते तर यावेळी विद्यार्थी हक्क कृती समितीचे संस्थापक सचिव रामराजे काळे, संस्थापक उपाध्यक्ष मयुरी काळे, युवती प्रदेशाध्यक्ष कल्पना फरकांडे, लातूर जिल्हा युवती अध्यक्षा पल्लवी हाके, लातूर जिल्हाध्यक्ष शंभु सुर्यवंशी, लातूर जिल्हा सहसचिव माधव तरगुडे, लातूर तालुकाध्यक्ष रितेन रत्नगोले, संपर्कप्रमुख संभाजीआप्पा लातूरे, पुणे येथील पदाधिकारी तृप्ती पानसरे, ऋतुजा पायगुडे आदिसह मोठ्या संख्येने विद्यार्थी हक्क कृती समितीचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमचे सुत्रसंचलन ऋतुजा म्हेत्रे यांनी केले तर आभार पल्लवी हाके या विद्यार्थीनीने मानले.
सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांना मिळालेल्या या माणुसकीचे दर्शन पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या