लॉकडाउन काळात भादेकराच्या "आधार प्रतिष्ठानने"दिला मोठा आधार
औसा प्रतिनिधी
औसा- राज्यात संपूर्णतः लॉक डाऊन परस्थिती निर्माण झाली असताना अनेकांच्या हाताला काम नाही ,रोजगार नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली ,अनेक सामाजिक संस्था ,प्रतिष्ठाने वेगवेगळ्या पद्धतीने मदतीसाठी पुढे आले.असेच एक प्रतिष्ठान ज्याचे नाव भादा येथील "आधार प्रतिष्ठान" आहे.या प्रतिष्ठानने दि 14 एप्रिल 2021 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या सामाजिक उपक्रमास सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले तर बंद कालावधीमध्ये ज्यांना रोजगार नाही,ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे, ज्यांना एक वेळेचे जेवन सहज मिळत नाही. अशा घरांचा संस्थेकडून शोध घेऊन त्यांच्यापर्यंत अन्नधान्याचा पुरवठा केला. तसेच कोविड काळामध्ये राज्याला रक्ताची गरज असताना रक्तदान शिबिर घेऊन रक्तसाठा 125 बॉटल जमविला. मागील दोन महिन्यापासून सतत जनतेच्या संपर्कात राहून कुणाला कशाची गरज आहे, याचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत ती मदत पोहचविण्याचे कार्य "आधार प्रतिष्ठानाने" केले आहे. दिनांक 6 व 7 जून 2021 रोजी, आधार प्रतिष्ठान,भादा.जी लातूर यांच्या वतीने इच्छुक दात्याकडून एकत्रित करण्यात आलेले जीवनावश्यक धान्य, तसेच आधार प्रतिष्ठान, भादा यांच्या वतीने घेण्यात आलेले इतर साहित्य, एकत्रित करून एका कुटुंबाचे काही दिवस धान्याची गरज भागून व्यवस्था होईल या हेतूने किट वाटप करण्यात आले.
सदरच्या किटमध्ये, पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो कांदा, एक किलो मिठ, हळदी पुड, मिरची पुड, तेल पॉकेट,असे किट तयार करून जे खरे गरजू आहेत,ज्यांचे covid-19 च्या प्रादुर्भावामुळे खूप नुकसान झाले आहे,रोजगार नाही, दोनवेळच्या जेवणाची हाता तोंडाशी व्यवस्था नाही, अशा गरजूंची, विविध भागातील परिचितांकडून, यादी तयार करण्यात आली. आणि अशाच गरजूंना सदरची मदत घरपोच त्यांना घरी जाऊन देण्यात आली, विशेषतः खेड्या पेक्षा शहरामध्ये वाढलेली बेरोजगारी,अन्नधान्याचा तुटवडा पाहता, शहरी जनतेला गावातील जनतेकडून आधार या उद्देशाने लातूर शहरातील काही भागात, लातूर शहरालगत असणाऱ्या पाखरसांगवीत,औसा शहरातील काही भागात तर भादा,हळदुर्ग ता औसा या गावात या अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले,किट वाटपाच्या वेळी covid-19 च्या आजाराला रोखण्यासाठी घ्यावयाची दक्षता आणि लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले विशेष पत्रके,मास्क, वाटप करण्यात आले व याबाबत माहितीही सांगण्यात आली या सर्व कार्यात आधार प्रतिष्ठान सोबत सुर्योदया सायन्स फाउंडेशन, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याकामी प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.