🔖 *रिपोर्टर लातूर न्यूज ।। *
*सोन्याचे हॉलमार्किंग म्हणजे काय ! - प्रत्येकाने वाचा ,महत्वाचे नॉलेज अपडेट*
राज्यातील २१ जिल्ह्यात हॉलमार्किंग कालपासून बंधनकारक झाले याविषयी आपण आज सकाळी जाणून घेतले
दरम्यान आता हॉलमार्किंग म्हणजे काय ? - किंवा यामुळे सोन्याच्या दागिन्यात काय बदल होतात ते आपण समजून घेऊ
*सुरवातीला समजून घ्या* - हॉलमार्किंग हे एकप्रकारे सोनाच्या शुद्धतेचं प्रमाणपत्रच असते , म्हणजे याद्वारे आपल्याला ते सोनं खरं कि खोट हे समजते -हॉलमार्क झालेल्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्कचे काही चिन्ह असतात - त्यामुळे आपल्याला सोनं खरं किंवा खोटं हे सहजपणे ओळखता येते
*कोणती आहेत हॉलमार्कचे चिन्ह ?*
● *बीआयएस मार्क* - सर्वात महत्वाचे म्हणजे अशा सोन्याच्या वस्तू किंवा दागिन्यांवर , भारत सरकारची मान्यता प्राप्त संस्था असलेल्या बीआयएसकडून बीआयएस मार्किंग दिली जाते , यामध्ये त्रिभुज आकाराचा एक हॉलमार्क दिला जातो
● *सोनाराचे आयडेंटिफिकेशन मार्क* – हे सुद्धा महत्वाचे आहे , इथून पुढे जेंव्हा तुम्ही सोने खरेदी कराल - तर त्यावर तुम्ही ज्या सोनाराकडे दागिणे खरेदी कराल तो देखील आपलं चिन्ह आणि क्रमांक लावणार
● *कॅरेटची माहिती* - यामध्ये सोने किती कॅरेटचे आहे ते देखील सांगितले असते - तसे तुम्हाला माहिती असेल 24 कॅरेटचं सोनं सर्वाधिक शुद्ध असते - मात्र अनेक वेळेस दागिणे करण्यासाठी त्यात झिंक वापरावं लागते त्यामुळे सोनं 22 कॅरेट असते
*सोनाच्या हॉलमार्किंग बद्दलचे*- हे नॉलेज अपडेट प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे ,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.