रेशन दुकान बंद करुन गावातील महिला बचतटास देण्यात यावे हल्दुर्ग नागरिकांची मागणी

 रेशन दुकान बंद करुन गावातील महिला बचतटास देण्यात यावे हल्दुर्ग नागरिकांची मागणी





औसा प्रतिनिधी

रेशन दुकान बंद करुन गावातील महिला बचतटास देण्यात यावे हल्दुर्ग नागरिकांची मागणी होत आहे


 सविस्तर वृत असे की हळदुर्ग ता. औसा जि. लातूर येथील स्वत धान्य दुकानदार श्री. बालाजी तात्याराव कांबळे हे गावामध्ये धान्य कोठा उचल करतात मात्र गावामध्ये कार्डधारकांना वाटप केलेला नाही, माहे एप्रिल २०२१ व मे-२०२१ चा धान्य कोठा अदयाप वाटप केलेला नाही माहे मे २०२१ मधील (प्र.ग.क.यो) कोठा अदयाप वाटप केलेला नाही धान्य वाटप करण्यासाठीची कमीटीचे अस्तीत्वात नाही असे श्री. कांबळे यांचे म्हणणे आहे. माल वाटप करत असतांना कधीही कमीटीसमोर वाटप करत नाही व पावती ही देत नाही. धान्य विक्री करतांना बील पावती कोणासही देत नाही व कार्डधारकांनी मागीतल्यानंतर अरेरावीची भाषा श्री. कांबळे बालाजी करतो. गावातील मजुर कार्डधारक मजुरीसाठी बाहेरगावी गेले असुन त्यांच्या नावाचा माल स्वतःच्या किराणा दुकानामध्ये ज्यादा भावाने विक्री करत आहे. अंत्योदय योजनेमध्ये नियमाप्रमाणे येत असलेली साखर अदयाप पर्यंत पात्र कार्डधारकांना दिलेली नाही, प्रत्येक कार्ड धारकांना युनिटप्रमाणे नियमानुसार माल वाटप न करता स्वतःच्या मर्जीने कमी जास्त माल वाटप करत आहे. बाकी कार्डधारक गावातील रहिवाशी नसुन त्यांचे कार्ड तयार केले असून त्यांचाही माल किराणा दुकानात चढ्या भावाने विकत आहे.


कार्डधारकामध्ये लहाण मुले त्यांचे नावे असून ही त्यांचा युनिटमध्ये समावेश असुनही नियमाप्रमाणे माल देत नाही यादीमध्ये बरेच मयत सदस्य, लग्न होवून गेलेल्या मुली यांचेही माल उचल करुन वाटप न करता बाहेर काळ्या बाजारात विक्री करतो.

वरील प्रमाणे श्री बालाजी तात्याराव कांबळे स्वत धान्य दुकानदार हळदुर्ग हे गावातील मजुर वर्गाचे व कष्टकन्यांचे रेशनचा माल हडप करुण काळया बाजारात विक्री करुण सदरील नागरीकावर अन्याय


करत आहे.

योग्य ती चाकशी करुन सदर रेशन दुकान बंद करुन गावातील महिला बचतटास देण्यात यावे ही अशी मागणी 

प टेल कमाल बहादुर

कांबळे राम रामा कोवळे अशोक लवकू

उबाळे राजेंद्र मोहउबाळे हणमंत मोहण

कांबळे नंदकुमार अशोक

बैंडणार नामदेव गुंडीश

चव्हाण दुर्गापा लक्ष्मण

आयाज समद पटेल . बंगर गोविंद माणीक


महादेव विलास लालू कांबळे राम Quot महादेव

कामदेव


बंडगर युवरात अन्नाश सक्सन


कांबळे विकास अगो विकास

कांबळे दादासाहेब बळीराम


कांबले तानाजी बाजीराव


कांबळे किरण व्यकंट ® कांबळे दत्ता गोपाळ


कांबळे दत्ता


कोळे जयराम यशवंत (ग्राम पंचायत सदस्य ) आदि ने केले आहे 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या