जिल्हाधिकारी मा. श्री पृथ्वीराज यांच्या कडून चिमूकल्या प्रांजल चव्हाण चे कौतुक.
प्रांजल उध्दव चव्हाण हिने काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर सर केले होती अशी कामगिरी करणारी ती सर्वात कमी वयाची मुलगी ठरली आहे. प्राजलं च्या या विक्रमांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराज बी पी यांनी प्राजलं चे कौतुक केले. चिमुरड्या प्रांजल बरोबर कळसुबाई शिखरा विषयी चर्चा केले व प्रांजल ला विविध प्रश्न विचारले प्रांजल ने ही न घाबरता परखड पणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
जिल्हाधिकारी श्री प्रथ्वीराज यांनी प्रांजल ने आतापर्यंत केलेल्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच आशिया बुक ऑफ रेकॉर्ड बाबत माहिती घेऊन प्रांजल ला पुढील विक्रमासाठी शुभेच्छा दिल्या . प्रांजल सोबत प्रांजल चे वडील उद्धव चव्हाण व आई दिपाली चव्हाण तसेच मामा अविनाश जाधव उपस्थित होते.
*प्रांजलने केलेली उत्कृष्ट नेत्रदीपक कामगिरी*
• महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर २ तास ५८ मिनिटांत सर करणारी कमी वयाची मुलगी म्हणून *इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड* मध्ये नोंद.
• ४० प्रसिद्ध साहित्याची नावे ५९ सेकंदामध्ये
नावे सांगणारी कमी वयाची मुलगी व
• ४५ भारतातील प्रसिद्ध व्यक्तीची समाधी स्थळ नावे 54 सेकंदात सांगणारी कमी वयाची मुलगी म्हणून *एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड* मध्ये नोंद.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.