हळदुर्ग येथील स्वस्त धान्य दुकान महिला बचत गटास चालविण्यासाठी द्या...
आँसा / प्रतिनिधी आँसा तालुक्यातील हळदूर्ग येथील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना वितरित करावयाचे धान्य वाटप केले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार औसा यांच्याकडे केली आहे. माहे एप्रिल आणि मे २०२१ मधील शासकीय गोदामातून उचललेले धान्य हळदुर्ग येथील रेशन कार्डधारकांना वितरित केले नाही. तसेच गावातील रास्त भाव दुकानातील अन्नधान्य वितरणाचे नियोजन करण्यासाठी कमिटी स्थापन केलेली नाही. तसेच दुकानचालक हे कमेटीच्या समोर धान्याचे वितरण करीत नाहीत, शिधापत्रिकाधारकांना पावत्या
देत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. पावती मागितल्यास अरेरावीची भाषा केली जाते. तसेच कांही मजूर बाहेरगावी कामासाठी गेले असता त्यांच्या हिश्श्याचे धान्य लाभाथ्र्यांना न देता जादा दराने किराणा दुकानात विकत आहे. बाहेरगावी असलेल्या व्यक्तीच्या नावे हळदुर्ग येथील रेशन कार्ड बनवून स्वस्त धान्य दुकानातील जीवनावश्यक वस्तू वितरणात गैरव्यवहार करीत आहे, हळदूर्ग येथील स्वस्त धान्य दुकान चालकाचा मनमानी कारभारामुळे गरजू लोकांना धान्य वेळेवर मिळत नाही. तसेच शासकीय गोडाऊन मधून गावासाठी उचललेला जीवनावश्यक वस्तूचा धान्याचा कोटा
उचलून याचा गैरव्यवहार करणारे स्वस्त धान्य दुकान चालक बालाजी तात्याराव कांबळे यांची सखोल चौकशी करून त्यांचा परवाना रद्द करावा आणि महिला बचत गटास दुकान चालविण्यासाठी देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनावर कमाल पटेल, बळीराम कांबळे, शेषराव कांबळे, अशोक कांबळे, यशवंत कांबळे, राजेंद्र उबाळे, हनुमंत उबाळे, नंदकुमार कांबळे, नामदेव बंडगर, दुर्गाप्पा चव्हाण, अय्याज पटेल, गोविंद बंडगर, युवराज बंडगर, विकास कांबळे, दादासाहेब कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.