अनाधिकृत होर्डिंग्जवर मनपा करणार कार्यवाही.....
लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिका हददीतील जाहिरात एजन्सीधारकांना याव्दारे कळविण्यात येते की, आपल्या जाहिरात कराची थकबाकी ही भरणा करुन घ्यावी. तसेच आपल्या जाहिरात एजन्सीचे जाहिरात बोर्डची परवानगी ही संपलेली आहे व ती आपण नुतणीकरण करुन घेण्यात आलेली नाही. ती लवकरात लवकर नूतनीकरण करुन घेण्यात यावी. तसेच लातूर शहरातील नागरीकांना सूचीत करण्यात येते की जाहिरात करतेवेळी आपल्या जाहिरात एजन्सीधारकाने नुतनीकरण केलेले आहे किंवा जाहिरात कर भरला आहे का याची तपासणी करुनच जाहिरात एजन्सीला काम देण्यात यावे. अन्यथा सदरील जाहिरात मनपाव्दारे काढून टाकण्यात येणार आहे. तसेच सदरील जाहिरात बोर्ड हे खाजगी इमारतीवर आहेत. ज्या इमारतीवर हे बोर्ड लावण्यात आलेले आहेत त्या मालमत्ताधारकांनी जाहिरात एजन्सीने जाहिरात कराचा भरणा केला आहे का याची खाञी करुनच परवानगी दयावी अन्यथा सदरील मालमत्ताधारकांवर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.
तसेच ज्या खाजगी व्यापारी आस्थांपना यांनी आपल्या दुकानावर नावाचा एकच फलक त्याची साईज रुंदी 2.5 फुट व लांबी गाळयाच्या 80% असावी व एकच साईन बोर्ड लावता येईल व दुकानासमोर नावाचा फलक (स्टॅंन्डी) असेल तर तात्काळ काढून घेण्यात यावी. अन्यथा सदरील आस्थापनावर कार्यवाही करण्यांत येईल याची नोंद घेण्यात यावी.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.