एम.फील. प्रदान केल्या बद्दल साकेब उस्मानी यांचा सन्मान ..
लातूर : गांधी मार्केट येथे श्री. साकेब अब्दुल हकीम उस्मानी लातूर जिल्हाधिकारी आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी पदावर कार्यरत असुन यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने व्यवस्थापनशास्त्र विषयात 'ए' ग्रेडमध्ये एम. फील. पदवी प्रदान करण्यात आली आहे. या यशप्राप्तीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला उपकेंद्र लातूर येथील व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या संशोधन केंद्रातुन सहा. प्राध्यापक डॉ. प्रमोद एच. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "लातूर जिल्ह्यातील दुष्काळ आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या सामाजिक - आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम याचा अभ्यास" या विषयावर संशोधनपर प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. त्याचे मूल्यमापन होऊन त्यांच्या संशोधनाचे सादरीकरण व तोंडी परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार विद्यापीठाच्या दिनांक 29/05/2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे त्यांना एम. फील. पदवी अवार्ड करण्यात आली आहे. संशोधनात उस्मानी यांनी लातूर येथे निर्माण झालेल्या दुष्काळ वर्षे, सन 1958 ते 2020 पर्यंतच्या पर्जन्यमानाची चिकित्सा, सन 2016 चे लातूर मधील दुष्काळ व त्याचे व्यवस्थापन, दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर झालेल्या सामाजिक - आर्थिक परिणाम ई. बाबीचा अभ्यास केला लातूर येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी विषेश परिश्रम नोकरी करत घेतले हे उल्लेखनीय होय निर्माण संस्थेचे संस्थापक अझहरभाई सय्यद यांनी विषेश परिश्रम घेऊन श्री .साकीब उस्मानी साहेब यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मा.सय्यद सलीम साहेब ,अब्दुल समद शेख , कदिर मणीयार , अझहरभाई सय्यद ,खलील शेख ,अहेमद भाई आदी मान्यवर उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.