रेणापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय तयारी करणार - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे शिवसैनिकांनी एकजुटीने लढण्याचे दिले आदेश

 

रेणापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय तयारी करणार
- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे 

शिवसैनिकांनी एकजुटीने लढण्याचे दिले आदेश








 रेणापूर/प्रतिनिधी:आगामी काळात रेणापूर नगर पंचायतीची निवडणूक होणार आहे.यासाठी विशेष नियोजन समिती बनवून वॉर्डनिहाय तयारी करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.शिवसैनिकांनी एकजुटीने व ताकदीने ही निवडणूक लढण्याचे आदेशही त्यांनी दिले.
   जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने चंद्रकांत खैरे यांनी दौरा केला.या दौऱ्यात रेणापूर येथील शासकीय विश्रामगृहात त्यांच्या उपस्थितीत निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीस जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी,जिल्हाप्रमुख नामदेव चाळक,माजी महिला जिल्हा संघटक शोभाताई बेंजरगे,लिंबन महाराज रेशमे, संभाजीनगरचे शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी,वीरभद्र गादगे,उपजिल्हाप्रमुख सचिन दाने,तालुकाप्रमुख हरिभाऊ साबदे,शिवाजी माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
 यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, यापुढे शिवसेना रेणापूर तालुक्यात आक्रमकपणे काम करणार आहे.रेणापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहणार आहे.रेणापूर नगरपंचायत निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी उपजिल्हाप्रमुख सचिन दाने व तालुकाप्रमुख हरिभाऊ साबदे यांच्या नेतृत्वात विशेष नियोजन समिती तयार केली जाणार आहे.या समितीच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डमधील समस्या जाणून घेत तयारी केली जाईल. शिवसैनिकांनी एकत्रितपणे युवा नेते उपजिल्हाप्रमुख सचिन दाने व अनेक वर्षांचा अनुभव असणारे तालुकाप्रमुख हरिभाऊ साबदे यांच्या यांच्या नेतृत्वात काम करावे.कसलेही गट न ठेवता नव्या व जुन्या शिवसैनिकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
   प्रारंभी उपजिल्हाप्रमुख सचिन दाने व तालुकाप्रमुख हरिभाऊ साबदे यांच्या हस्ते रेणापूर तालुक्याच्या वतीने खैरे यांचा सत्कार करण्यात आला.अनिल फुलारी यांनी प्रास्ताविक केले. तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या अडचणी मांडून शिवसैनिकांना बळ देण्याची मागणी त्यांनी केली.हरिभाऊ साबदे यांनी आभार मानले. या बैठकीस तालुक्यातील शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या