गाव तलावातील सांडव्याचे पाणी मोठ्या नालीत सोडणे बंद करा: मोमीन गल्लीतील नागरिकांची मागणी
औसा प्रतिनिधी
औसा येथील मोमीन गल्ली येथील मोठ्या गटारीत जोडण्यात आलेल्या जमाल नगर तलाव सांडवा व हाशमी चौक ते तहसील समोरील मुख्य गटारीचे पाण्याचा मार्ग त्वरीत बंद करण्यात यावे.याबाबत आज दिनांक 2 जुन बुधवारी समस्त मोमीन गल्लीतील नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद औसा यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यामध्ये मागील 4 ते 5 वर्षापासून औसा जमाल नगर तलावाला दोन सांडवे होते.एक सांडवा मोमीन गल्ली मार्ग मुख्य गटारीला जोडलेला होता,व दुसरा सांडवा कालनगल्ली बस स्थानक समोरुन जाणारा मुख्य गटारीला जोडलेला होता.तरी पण मागील 4 ते 5 वर्षापासून कालनगल्ली समोरील मुख्य गटारीतून जाणारा तलावाचा सांडवा बंद करण्यात आलेला आहे.त्यामुळे आता मोमीन गल्ली येथील मोठ्या गटारीतुन तलावाचा सांडवा व हाशमी चौक येथुन येणारा मोठ्या गटारीचे पाणी सोडण्यात येत आहे.यामुळे पावसाळ्यात सर्व पाणी तुंबुन मोमीन गल्ली येथील पूर परिस्थिती दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होत आहे.व हे पाणी स्थानिक नागरिकांच्या घरात शिरत असल्याने मोठे आर्थिक नुकसान व आरोग्याला धोका निर्माण होत आहे.तरी नगरपालिकेने याबाबत दखल घेऊन मोठ्या गटारीचे हाशमी चौक ते तहसिल समोरील मुख्य गटारीचे मार्ग त्वरीत बंद करण्यात यावे,अशी मागणी मोमीन गल्लीतील समस्त नागरिकांनी मुख्याधिकारी नगरपरिषद औसा यांना निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी या निवेदनावर मोमीन समाजाचे खुंदमिर मुल्ला,एकबाल बरोटे,म.मुस्लीम कबीर आदिच्या स्वाक्ष-या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.