महाराष्ट्र शासनाच्या संस्कृती व विश्वकोश मंडळावर मुस्लिम मराठी साहित्यिकांची नियुक्ती करण्याची मागणी .

 महाराष्ट्र शासनाच्या संस्कृती व विश्वकोश मंडळावर मुस्लिम मराठी साहित्यिकांची नियुक्ती करण्याची मागणी .


ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचा पुढाकार









औसा प्रतिनिधी 

 १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात अंदाजे २ कोटी मुस्लिम समाज आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ती, जैन, शीख, पारसी , बौद्धधर्मीय अल्पसंख्यांकही आहेत. दोन्ही संस्थाच्या कार्यकाळी मंडळात एकही मुस्लिम, ख्रिस्ती वा जैन धर्मीय सदस्य नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या  सांस्कृतिक कार्य मंत्रालया अंतर्गत या नियुक्त्या होतात. महाराष्ट्राच्या  सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला फक्त  विशिष्टधर्मीय संस्कृती आणि साहित्य अभिप्रेत आहे काय? 

    महाराष्ट्रातील मराठी भाषेवर फक्त एका धर्म विशेषाचीच मक्तेदारी आहे काय? इतर धर्मीयही साहित्यिक आहेत , आणि तेही तितक्याच तन्मयतेने आणि अभिरुचीने मराठी साहित्य निर्मिती करीत आहेत. इतकेच नव्हे तर मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीद्वारे गेल्या ३० वर्षांपासून महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले जाते. विशेष म्हणजे या साहित्य संमेलनांना शासनामार्फत कोणताही निधी दिला जात नाही. मुस्लिम मराठी साहित्यिक पदरमोड करून ही साहित्य संमेलने भरवतात. 

      आज महाराष्ट्रात १००० च्यावर मुस्लिम मराठी साहित्यिक मराठी साहित्यात मोलाची भर घालत आहेत. मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाने कथा, कविता, कादंबरी, आत्मकथन, गज़ल, बालसाहित्य, नाटक, वैचारिक लेखन अशा विविध ललित प्रकारात आपला ठसा उमटवला आहे. यात प्रामुख्याने खलील मोमीन, डॉ अब्दुल आझम, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर,  डॉ. शेख इक्बाल मिन्ने, ए .के .शेख, फ. म .शहाजिंदे, स्व.डॉ जुल्फि शेख, डॉ. अजीज नदाफ, बशीर मुजावर, रफीक सुरज, स्व.डॉ अक्रम पठाण, प्रा .फातिमा मुजावर, डॉ .अलीम वकील, मुबारक शेख, डी.के .शेख, प्रा.जावेदपाशा कुरेशी, सरफराज शेख,असिफ अन्सारी, फर्जाना डांगे,साबीर सोलापुरी, इरफान शेख, शफी बोल्डेकर, हाशम पटेल, बा.ह.मगदूम ,डाॅ. सय्यद जब्बार पटेल ,रफीक काझी, कलीम अझीम, आय. जी .शेख, साहिल कबीर, मुहिब कादरी, साबिर सोलापूरी ,डाॅ.हबीब भंडारे , शेख बिस्मिल्ला सोनोशी ,शब्बीर मुलाणी , अनिसा शेख , दिलशाद सय्यद , निलोफर फणिबंद , अॅड. शबाना मुल्ला , शेख निजाम गवंडगांवकर , अॅड. शेख इक्बाल रसूलसाब ,खाजाभाई बागवान , डाॅ. सय्यद अकबर लाला ,डाॅ. अर्जिनबी युसूफ शेख , डाॅ. इ. जा. तांबोळी , मोहिद्दीन नदाफ , रमजान मुल्ला , फिरोज बागवान , डाॅ. म. रफी म. युसूफ शेख , परवीन , कौसर ,बि . एल. खान ,सय्यद चाँद तरोडकर , शेख शाहीद , अहमद पिरनसाहाब शेख ,इक्बाल मुकादम,काजी के.टी,सय्यद मुजफ्फर ,नसीम जमादार ,मुबारक उमराणी , प्रा. नुरजहाँ पठाण , जाकीर तांबोळी , जस्मिन रमजान शेख , वाय . के . शेख , शेख नजमा मैनुद्दीन , जावेद भवानीवाले , शेख जाफर राजेसाहाब , जाफर आदमपूरकर ,  रजिया दबीर , सबिया सय्यद , सुरैय्या परवीन , सफुरा तांबोळी , या सारख्या साहित्यिकांचा सिंहाचा वाटा आहे.

      असे असताना महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या शासकीय समित्यांचे गठण होत असताना ,एकाही मुस्लिम साहित्यिकाची आठवण होऊ नये याचे नवल वाटते. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आहे आणि त्यांनाही याचा विसर पडावा ही शोकांतिका आहे. खरेतर ही मंडळे सर्वसमावेशक आणि भौगोलिकदृष्ट्याही समतोल राखणारी असावीत. 

     मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था. याबद्दल अत्यंत नाराजी व्यक्त करीत असून अशी मागणी करीत आहे की मुस्लिम मराठी साहित्यिकांपैकी किमान ४ साहित्यिकांचा समावेश या दोन्ही मंडळात करावा आणि समान संधी उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे ख्रिस्ती, जैन , आदिवासी साहित्यिकांचाही समावेश व्हावा अशी मागणी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ. म. रफी म. युसूफ शेख , कोषाध्यक्ष शेख शफी बोल्डेकर , सचिव डाॅ . सय्यद जब्बार पटेल ,अध्यक्ष अॅड. हाशम इस्माईल पटेल , उपाध्यक्ष खाजाभाई बागवान , सहसचिव अनिसा शेख , इस्माईल शेख , महासेन प्रधान , शेख जाफर राजेसाहाब ,  इंतेखाब फराश यांनी एका निवेदनाद्वारे  केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या