*ओबीसी ब्रिगेड औसा तालुकाध्यक्षपदी विठ्ठल पांचाळ यांची निवड*
औसा प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाज हा 65 ते 70 टक्के असा असुन या ओबीसी ला बहुसंख्यांक म्हणून ओळखले जाते. या समाजाच्या सामाजिक आर्थिक राजकीय हित जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव आक्रमक संघटना म्हणून ओबीसी ब्रिगेडची सर्वत्र ओळख आहे. फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होऊन आपल्या मूलभूत हक्क रक्षणासाठी समता बंधुता न्याय या विचाराचे एक पुरस्कर्ते म्हणून आपणास ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करून समाज संघटन मजबूत करण्यासाठी व ब्समाजाच्या हिताचा विचार करून वंचित राहिलेल्या समाजबांधवाना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत राहावं याकरिता ओबीसी ब्रिगेड औसा तालुकाध्यक्ष पदी आपली निवड करण्यात येत असून आपले नियुक्ती पत्र देण्यात येत आहे. या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष नागोराव पांचाळ ,ओबीसी ब्रिगेड सचिव सुधाकर आंदोले यांच्या सहीने देण्यात आले आहे. ओबीसी बिग्रेडच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ओबीसी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सुदर्शन बोराडे ,मराठवाडा अध्यक्ष अजित निंबाळकर, जिल्हाध्यक्ष दिलीप पिनाटे यांनीही अभिनंदन केले असून सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.