ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या संकल्पनेतून तीन हजार झाडांचे औशात वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट
औसा मुख्तार मणियार
औसा : ग्रीन लातूर वृक्ष टीम यांच्यामार्फत ग्रीन औसा या संकल्पनेतून औसा मध्ये यावर्षी भव्य 2000 मोठी झाडे आणि 1000 छोटी झाडे असे एकूण तीन हजार झाडांचं पुढील काही दिवसात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.. त्या संदर्भात आज ग्रीन लातूर वृक्ष टीमचे लातूर महानगरपालिकेचे नगरसेवक इम्रानभाई सय्यद व मनमोहन जी डागा यांनी पाहणी केली. यावेळी पाहणी करताना माजी नगरसेवक अॅड समिउल्ला पटेल, सामाजिक कार्यकर्ते खुन्मीर मुल्ला , पत्रकार पाशाभाई, साबेर इनामदार व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.
ग्रीन लातूर वृक्ष टीम ही मागील सात वर्षांपासून लातूर हरित करण्यासाठी प्रयत्नशील आहे..त्यांनी मागील 742 दिवसात सतत न थांबता सकाळी सहा ते नऊ दररोज असं 58000 झाडे लावून त्यापेक्षा जास्त झाडे जगवली..लातूर जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री अमितभैया देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू असलेल्या ग्रीन लातूर वृक्ष टीम . व त्याचे सदस्य डॉक्टर पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद यांच्या माध्यमातून पूर्ण लातूर जिल्हा हरित कार्यासाठी प्रयत्न चालू आहेत.या प्रयत्नाची पावती म्हणून पूर्ण लातूर जिल्हा हरित होत आहे नक्कीच पुढील काही दिवसात पूर्ण लातूर जिल्हा डॉक्टर पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद यांच्या माध्यमातून हरित होईल असा सर्व लातूरकरांना विश्वास आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.