*उदगीर तालुक्यातील बामणी येथील कोडमंगले कुटुंबियांस महावितरणने तात्काळ मदत करावी*
- *लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकराव शेळके यांची मागणी*
उदगीर : दि. १४ - उदगीर तालुक्यातील बामणी येथील कोडमंगले पिता-पुत्र यांच्या अंगावर विद्युत तारा तुटून पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या दोघांच्याही मृत्यूस महावितरणचा गलथानपणाच कारणीभूत आहे.
शेतकरी कुटुंबातील पिता-पुत्र यांचा मृत्यू झाल्यामुळे ते कुटुंब उघड्यावर पडले आहे. महावितरणने या कुटुंबाला तात्काळ प्रत्येकी किमान पाच पाच लाख असे एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी. अशी मागणी लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके यांनी केली आहे.
बामणी येथील शेतकरी नारायण कोडमंगले व त्यांचा मुलगा रामेश्वर कोडमंगले हे लुना वरून जात असताना रस्त्यावरील विद्युत तारा तुटून त्यांच्या अंगावर पडल्याने त्या दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला आहे.
महावितरणने उदगीर तालुक्यातील विविध गावातील पोलवरील लोंबकळत असलेल्या तारा ओढून घेऊन तसेच वाकलेले पोल सरळ करून पुन्हा अशी दुर्दैवी घटना घडणार नाही याची खबरदारी घ्यावी घ्यावी असे आव्हान लोकाधिकार संघाचे प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके यांनी महावितरणला केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.