महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा तर्फे पत्रकार राम कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षरोपण !
औसा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार राम कांबळे यांच्या वादिवसा निमित्त औसा शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात वटवृक्षाचे रोप लावून वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला पर्यावरणाचे संतुलन राखता यावे आणि कोरोनाच्या संकट काळात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्यामुळे शासकीय विश्राम ग्रह समोर वटवृक्षाची लागवड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे औसा तालुका अध्यक्ष आसिफ पटेल यांच्या शुभहस्ते आणि पत्रकार इलियास चौधरी,मुख्तार मणियार,गंगाधर जाधव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी दत्तात्रय फरकांडे,मेहबूब शेख,विश्वनाथ लोंढे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.