*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणीच्या वतीने कोविड योद्धांचा सन्मान!*
देवणी प्रतिनिधी:-
जागतिक पालक दिना निमित्त सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोविड योद्धांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, देवणीच्या वतीने सन्मानपञ देऊन गौरव करण्यात आला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष रणदिवे लक्ष्मण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी देवणी सं गां यो संजयगांधी कमिटिचे सदस्य यशवंत सोनकांबळे, सरोजा शिंदे, विजयश्री बोचरे, सुरेखा सोनकांबळे, ग्रामीण महिला विकास संस्थेच्या सौ कुशावर्ता बेळेताई आदी कोविड योद्धांना सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्या गावपातळीवर उत्कृष्ट कार्य केल्यामुळे त्यांचा कोविड योद्धांने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उत्कृष्ट कार्य सुरू असून त्या चांगल्या कार्याचा आम्ही गौरव स्विकारत असल्याचे यावेळी कोविड योद्धांनी सांगितले.
गौरवाबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य महिलध्यक्षा डॉ सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे, अजयभाऊ सूर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, संघटक साहेबराव कोलंबीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा संघटक संजय राजुळे,जिल्हा महिलध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा समन्वयक सुनील बरुरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा महिला संघटक छायाताई गुणाले सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी देवणीच्या कार्यकारिणीचे कौतुक केले आहे. सामाजिक कार्याची जाण असणाऱ्या समाजसेवकांना या संघाच्या माध्यमातून प्रेरणा व उत्साह मिळत आहे. यावेळी ग्रामीण महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा कुशावर्ता बेळे, देवणी प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचे अध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, सर्व पदाधिकारी प्रेरणा जाधव, सुखवास ईसाळे, कृष्णा इंगोले, नागनाथ सुर्यवंशी,विकास बिरादार आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.