औशात जामा मस्जिद ते हनुमान मंदिर पर्यंतचा रस्ता रुंदीकरणाचे काम त्वरीत सुरू करा:एम आय एम पक्षाची मागणी
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील मुख्य रस्त्याचे रखडलेले जामा मस्जिद ते हनुमान मंदिरापर्यंत तिसऱ्या टप्प्याचे रस्ता रुंदीकरणाचे काम त्वरीत चालू करण्याची मागणी एम आय एम पक्षाच्यावतीने आज दिनांक 29 जून 2021 मंगळवार रोजी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये औसा शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यामुळे ग्रामीण भागातील येणाऱ्या-जाणाऱ्या जनतेला अडचणीस सामोरे जावे लागत आहे. तिसऱ्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरण जामा मस्जिद ते हनुमान मंदिरा पर्यंतचा रस्ता मुख्य बाजारपेठचा असून हा रस्ता 60 फुटाचा असून सदर रस्त्यात येणारी वाहतूक लक्षात घेता हा रस्ता अरुंद होत आहे. म्हणून तो 80 फुटाचा रस्ता करण्यात यावा. सिमेंट रोड न करता डांबरी रोड करण्यात यावे. सिमेट रोड केल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे, व सिमेंट रस्त्यामुळे निसर्गावर परिणाम होऊन पाऊस वेळेवर होत नाही. याबाबत आपणास पक्षामार्फत वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. तरी मुख्याधिकारी साहेबांनी औसा शहरातील मुख्य रस्ता रुंदीकरण जामा मस्जिद ते हनुमान मंदिर पर्यंतचा 80 फुटाचा रस्त्याची मंजुरी घेऊन तो डांबरीकरणाने पूर्ण करावा.अशा आशायाचे निवेदन एम आय एम पक्षाच्या वतीने औस नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले. या निवेदनावर एम आय एम पक्षाचे अँड गफुरूल्ला हाशमी,सय्यद मुजफ्फर अली इनामदार, अँड रफिक शेख, शेख सलीम, शेख सिराज,रुकमोद्दीन आळंदकर, शेख निसार यांच्या सह्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.