उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खाजगी शिकवणी क्लासेस(ट्युशन) क्लासेस चालकांना त्यांचे वर्ग चालू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी - दत्ताभाऊ कुलकर्णी
अल्ताफ शेख प्रतिनिधी उस्मानाबाद,
मागील वर्षभरापासून चालू असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवण्या पुर्ण अवस्थेने बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून सध्या विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू आहे. पहिल्या लाटेमुळे मागील वर्षी प्रत्यक्षात शिक्षण व्यवस्था ही चाललीच नाही. या वर्षी पण दुसऱ्या लाटेमुळे शाळा, महाविद्यालये चालू शकले नाहीत, त्यामुळे केवळ ऑनलाईन या एवढ्याच पद्धतीवर विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रिया समजून घ्यावी लागत आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे तांत्रिकी दृष्ट्या विद्यार्थी अभ्यास करून पुढच्या वर्षी जातीलही परंतू त्यांच्या बौदि्धक विकासाचा प्रश्न ही मोठी समस्या निर्माण होत आहे, त्यामुळे खाजगी शिकवणी चालकांना मर्यादित क्षमतेनुसार कोरोनाच्या नियम, अटी व शासनाने दिलेल्या आरोग्याचे निर्देश पाळून शहर व जिल्ह्यातील खाजगी शिकवणी धारकांना मर्यादित संख्येनिहाय शिकवणी वर्ग चालू करण्यास मान्यता दिल्यास विद्यार्थ्यांचा निर्माण होणारा बौदि्धक विकासाचा प्रश्न सुटण्यास काही अंशी मदत होईल. कोरोना प्रादुर्भाच्या दुसऱ्या लाटेमुळे व संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेमुळे शाळा चालू होण्याची शक्यता धुसर दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निर्माण होणाऱ्या शैक्षणिक शंका निरसनासाठी खाजगी शिकवणी (ट्युशन) वर्गास मान्यता द्यावी व विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.