वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध वृक्षांची लागवड
लातूर, दि.२९ः वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी व लातूरचे विधी आघाडीचे सल्लागार ऍड.रोहित सोमवंशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने वंचित बहुजन आघाडी च्यावतीने मंगळवार,दि.२९ जून २०२१ रोजी रमाई आंबेडकर सोसायटी व स्वातंत्र्य सैनिक नगरात विविध जातींच्या वृक्षांचे अंंध वैद्यराज तुकाराम रोकडे यांच्या हस्ते रोपण करुन,यावेळी दोहोंना पुष्पमाला घालून अभिष्टचिंतन करण्यात आले.
ऑक्सिजन ही काळाची गरज बनली आहे,त्यासाठी सर्वत्र झाडांची लागवड व संगोपन करण्याची आवश्यकता असून, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी व लातूर विधी सल्लागार ऍड.रोहित सोमवंशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने लातूरच्या पूर्व भागातील रमाई आंबेडकर सोसायटी व स्वातंत्र्य सैनिक नगर सोसायटीमध्ये या दोघांचे पुष्पहार घालून शुभेच्छा देवून जांभळ,पिंपळ,साग,गुलमोहरआदींच्
याप्रसंगी पत्रकार बाळ होळीकर,ऍड.गणेश कांबळे, मारुती तलवार,किसन कांबळे गुरुजी, आशुतोष जोगदंड, संकल्प सिरसाट, सचिन सरवदे, रुपेश सोमवंशी,मनोज कदम, दिनेश कांबळे,बालाजी गंगणे,चेतन आदी वंचितचे कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.