वृत्त क्र.558
कृषि दिनानिमित्त 1 जुलै रोजी होणारे थेट प्रक्षेपण
शेतकऱ्यांनी पाहण्याचे आवाहन
लातूर, दि.29(जिमाका):- रब्बी हंगाम 2020 - 21 मधील राज्यस्तरीय पीकस्पर्धाचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या विजेत्या शेतकऱ्यांमधून चार निवडक शेतकन्यांचा सत्कार दि. 1 जुलै 2021 रोजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, महोदयांच्या शुभहस्ते मंत्रालय, मुंबई येथे होणार आहे. तसेच प्रत्येक विभागातील रिसोर्स बँकेतील प्रत्येकी एक शेतकरी झूम प्रणाली द्वारे सहभागी होणार आहेत. या सर्व शेतक-यांशी मुख्यमंत्री महोदय संवाद साधणार आहेत. सदरच्या कार्यक्रमाचे www.youtube.com/C/ Agriculture DepartmentGoM या कृषी विभागाच्या यूट्यूब चॅनेलवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांना व भगिनींना विनंती आहे की त्यांनी कृषी विभागाच्या https://www.youtube.com वरील Agriculture Department, GoM या चॅनेलला Subscribe करावे व सदर कार्यक्रम हा 1 जुलै कृषि दिन दिवशी दुपारी 12 वाजून 30 मी. होणार असून जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनी यांनी सदर कार्यक्रम बघावा असे आव्हान लातूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
****
वृत्त क्र.559 दिनांक:-29 जून 2021
शासकीय वसतिगृहास इमारत भाडयाने देण्यासाठी
10 जुलै पर्यंत अर्ज करावेत
लातूर, दि.29(जिमाका):- महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाव्दारे संचलित 75 विद्यार्थी क्षमता असलेल्या मुलांसाठीच्या शासकिय वसतिगृहासाठी लातूर शहरात सर्वसोयीयुक्त अशी भाडेतत्वावरील इमारत पाहिजे आहे.
सदर इमारतीत पर्याप्त निवासखोल्या, भोजनगृह,कार्यालय, भांडारग्रह, चौकिदार , निवासस्थान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, शौचालये, संरक्षण भिंत उपलब्ध् असावे. इच्छुक इमारतमालकांनी इमारतीच्या कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दि. 10 जुलै 2021 पर्यंत सादर करावेत असे आवाहन गृहपाल आदिवासी मुलांचे शासकिय वसतीगृह (जुने) अंबाजोगाई रोड,लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
वृत्त क्र.560 दिनांक:-29 जून 2021
जिल्हास्तरीय समितीकडून 100 रुग्णालयांतील
ऑक्सिजन वापराचे ऑडिट
लातूर, दि.29(जिमाका):-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या नियंत्रणाखाली पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉ. कमलाकर बकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय तंत्रनिकेतनातील प्रा. व्ही.डी. नितनवरे व इतर तज्ञ प्राध्यापक व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य व तज्ञ निदेशकांची समिती स्थापन करुन लातूर जिल्हयातील शासकीय व खाजगी कोविड रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट चे काम हाती घेण्यात आले.
समितीने 18 शासकीय व 82 खाजगी असे एकूण 100 रुग्णालयातील ऑक्सिजन प्रणाली त्यासाठी वापरलेले साहित्य, सुरक्षिततेसाठी केलेली उपाययोजना प्रत्येक रुग्णालयातील रुग्णांच्या बेडनुसार ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता, ऑक्सिजन वायू गळती,ऑक्सिजन चा योग्य व सुनियोजित वापर इत्यादी बाबी विचारात घेऊन नेमून दिलेले कार्य पूर्ण केले. तसेच तपासणी दरम्यान आढळून आलेल्या त्रुटी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या निदर्शनास आणून त्याबाबत तातडीने योग्य खबरदारी घेऊन त्रुटी दूर करणे बाबतचे निर्देश दिले.
अप्पर जिल्हाधिकारी अरिवंद लोखंडे यांनी गुगल मीट व्दारे ऑनलाईन बैठकीत आयोजन करुन ऑक्सिजन ऑडिट करणेबाबत सर्व समिती सदस्यांना प्रशिक्षण देऊन मोलाचे मार्गदर्शन केले व कामास तात्काळ सुरुवात करणेबाबतचे निर्देश दिले.
तसेच महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यातील ऑक्सिजन ऑडिटचे काम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांचे अभिनंदन केले. या दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी स्वत: लातूर शहरातील व इतर तालुक्यातील रुग्णालयांना भेटी देऊन ऑक्सिजन ऑडिट संबंधित आढावा घेतला.
कोविड च्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची वाढलेली प्रचंड संख्या व त्यानुसार ऑक्सिजनची वाढलेली मागणी या सर्व बाबीचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाने ऑक्सिजनचा सुयोग्य वापर होतो किंवा कसे याची तपासणी करणेसाठी व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे निर्देश देऊन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली.
नेमून दिलेली ऑक्सिजन ऑडिटची जबाबदारी विहित वेळेत यशस्वीरित्या पूर्ण केल्याबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज व अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्राचार्य डॉ.बकवाड, प्रा.नितनवरे व सर्व समिती सदस्य यांचे अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले.
वृत्त क्र.561 दिनांक:-29 जून 2021
एस.सी.समाजातील व्यक्तींचा कोवीडमुळे मृत्यू झालेला
असल्यास कुटुंबातील सदस्यांनी अर्ज करावा
लातूर,दि.29(जिमाका):-एनएसएफडी
तपशील / प्रकल्प मूल्य- रुपये 1 लाख ते 5 लाखापर्यंत, एनएसएफडीसी सहभाग 80 टक्के, भांडवल अनुदान 20 टक्के, व्याजदर 6 टक्के व परतफेडीचा कालावधी 6 वर्ष. पात्रता- अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाखापर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा. (कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक) मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी.मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरिता पुढील पैकी एक दस्तावेज आवश्यक आहेत. महारनगरपालिका / नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र. स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती. एखादया गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र. आवश्यक कागदपत्रे- मयत व्यक्तीचे नाव पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (3 लाखा पर्यंत), कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्युचा दाखला, रेशन कार्ड व वयाचा पुरावा.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 15 जून 2021 पर्यंत मृत्यु झालेल्या अनुसूचित जातीतील (SC) कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा हया लिंकवर https://forms.gle/
दिनांक 30 जून 2021 पर्यंत भरण्यात यावा.असे जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.) लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
वृत्त क्र.562 दिनांक:-29 जून 2021
जिल्ह्यात 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण
सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत सुरु राहणार
लातूर,दि.29(जिमाका):-लातूर जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 30 जून 2021 रोजीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे.
उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे फक्त दुसरा डोस कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, उपजिल्हा रुग्णालय निलंगा फक्त दुसरा डोस कोव्हॅक्सीन ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे फक्त दुसरा कोव्हॅक्सीन डोस ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय औसा फक्त दुसरा डोस कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय चाकूर फक्त दुसरा डोस कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय देवणी फक्त दुसरा, पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे फक्त दुसरा डोस कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे फक्त दुसरा डोस कोव्हॅक्सीन, पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे फक्त दुसरा डोस कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी फक्त दुसरा डोस कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट,पहिला व दुसरा कोविशिल्ड, ग्रामीण रुग्णालय रेणापूर फक्त दुसरा डोस कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे फक्त दुसरा डोस कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट व जिल्हयातील सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार फक्त दुसरा डोस कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट डोस सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु राहणार.
18 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध् साठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 30 जून 2021 रोजी कोवीशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात येत आहे.
लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
वृत्त क्र.563 दिनांक:-29 जून 2021
*महानगरपालिके मार्फत 18 ते 44 व 45 वर्ष पुढील
वयोगटासाठीचे लसीकरण 8 केंद्रावर होणार*
18 ते 44 वर्षे वयोगटातील पहिल्या डोससाठी 50 टक्के ऑनलाईन
व 50 टक्के ऑनस्पॉट लसीकरण
लातूर,दि.29(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 30 जून 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी पुढील प्रमाणे आहे. 18 ते 44 व 45 वर्षे पुढील वयोगटासाठीचे (फक्त दुसरा डोस) मोफत कोविड लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे. नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील, कोविशिल्ड लस उपलब्ध् नाही, त्यामुळे 18 ते 44 वर्षे व 45 वर्षापुढील वयोगटातील नागरीकांना पहिला डोस उद्या दिला जाणार नाही, अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.
विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर, दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर), विवेकानंद प्रा.विदयामंदिर (शिवाजी शाळा प्रांगण), लेबर कॉलनी लातूर,यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली, लातूर, प्रा.ना.आरोग्य केंद्र,राजीव नगर, विवेकानंद चौक लातूर, प्रा.ना.आरोग्य केंद्र,मंठाळे नगर, (मनपा शाळा क्र.09) व कै.बब्रूवान काळे आयुर्वेद महाविद्यालय,भोई गल्ली लातूर येथे कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे.
कोव्हॅक्सीन 18 ते 44 वयोगट फक्त दुसरा डोस (पहिला डोस घेवून 28 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील ) 45 वर्षावरील वयोगट फक्त दुसरा डोस सर्व आठ केंद्र सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील. कोविड- 19 लसीकरण संदर्भात काही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास मनपा हेल्पलाईन क्र. 9158632333 यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
वृत्त क्र.564 दिनांक:-29 जून 2021
संभाव्य तिसऱ्या लाटेपुर्वी लसीकरण करुन घ्यावे
लातूर शहर महानगरपालिकेचे आवाहन
लातूर,दि.29(जिमाका):-कोविड-19 आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचे डोस देण्यात येत आहेत. कोविड-19 आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे स्वत:साठी व तसेच कुटुंबातील लहान मुलांच्या सर्वांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. कोविड-19 प्रतिबंधक लस ही अत्यंत सुरक्षित आहे. व लसीकरण झाल्यानंतर कोविड -19 ची लागण होत नाही व जरी लागण झाली तरी त्याची तीव्रता अत्यंत कमी असते .कोविड -19 लसीकरणासाठी मनपाच्या वतीने शहरामध्ये विविध 17 ठिकाणी मोफत लसीकरण केंद्र चालू करण्यात आलेली आहेत. तसेच 02 मोबाईल लसीकरण केंद्र चालू आहेत.
महाराष्ट्रामध्ये नुकतेच डेल्टा प्लस कोरोना विषाणूचे रुग्ण् आढळून आले आहेत. सदरील विषाणूची प्रसारक्षमता तुलनेने जास्त असल्याने जागतीक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाने राज्यात नुकतेच निर्बंध लागू केलेले आहेत. तसेच विविध तज्ञांनी पुढील काही महिन्यांमध्ये भारतामध्ये कोविड-19 आजाराची तिसरी लाट येवू शकते. याबाबत यापुर्वीच धोक्याचा इशारा दिलेला आहे. प्रशासनामार्फत याबाबत सर्व आवश्यक दक्षता घेण्यात येत आहे.
तरी संभाव्य तिसरी लाट व तसेच डेल्टा प्लस विषाणूचे आढळून आलेले रुग्ण् लक्षात घेता 18 वर्षावरील लसीकरणासाठी पात्र असलेल्या ज्या नागरीकांनी अद्याप लसीकरणाचा एकही डोस घेतलेला नाही किंवा ज्यांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतलेला आहे व दुसरा डोस घेण्यासाठी विहित कालावधी पुर्ण झालेला आहे. त्यांनी लसीकरणाचा दुसरा डोस त्वरीत घ्यावा असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेने एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
वृत्त क्र.565 दिनांक:-29 जून 2021
दिल्लीच्या सेवाभावी संस्थेकडुन शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस 08 ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर मशीन भेट
लातूर, दि.29(जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस नवी दिल्ली येथील टीम मोफा या सेवाभावी संस्थेकडुन 08 ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीन सी. एस. आर. निधीमधुन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती विज्ञान संस्थेचे अधिष्ठता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी दिली.
लातुर जिल्हयात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने कोविड-19 रुग्णसंख्या आणि उपचारासाठी आवश्यक असलेला ऑक्सीजनचा पुरवठा लक्षात घेवुन सामाजिक बांधीलकी समजुन घेवुन मोफा टीम नवी दिल्ली या (NGO) सेवाभावी संस्थेकडुन 08 ऑक्सीजन कॉन्ट्रे टर या संस्थेस भेट देण्यात आले त्याबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी मोफा टीमचे आभार मानले.
या ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करुन देण्यासाठी मोफा टीमच्या साक्षी भुषण व लातुर येथील रहिवासी असलेले व दिल्ली येथे स्थायिक असलेले अभिजीत सोनटक्के यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. तसेच हे ऑक्सीजन कॉन्ट्रेटर उपलब्ध करुन घेण्यासाठी या संस्थेतील अजय कुदळे यांनी वेळोवेळी विशेष प्रयत्न केले असल्यसामुळे यावेळी त्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी उपअधिष्ठाता डॉ. मंगेश सेलुकर ,प्राध्यापक व विभागप्रमुख त्वचा व गुप्तरोग विभाग, डॉ. अजय ओव्हाळ, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, अति. वैद्यकीय अधिक्षक
डॉ. महादेव बनसुडे व स्वीय सहाय्यक अजय कुदळे हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.