आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम तालुका इन्चार्ज अफसर शेख यांची मराठवाडा प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्षा सोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न..
औसा/ प्रतिनिधी :- औसा तालुक्यातील येणाऱ्या काळातील आगामी निवडणुका पाहता एमआयएम पक्षाचे तालुका इन्चार्ज अफसर शेख यांनी एमआयएम प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील व मराठवाडा कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी यांच्यासोबत दारुस्सलाम, औरंगाबाद येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे.
याबाबत वृत्त की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाला औसा तालुक्यात भरघोस यश कसे संपादन करता येईल, व पक्षास बळकटी आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करावे लागतील, पक्षाला येणाऱ्या आगामी काळात निवडणुकांच्या सामोरे जाण्यासाठी पक्षाच्या ध्येय, धोरणानुसार पक्षाला नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाला निवडणुकीत कशा प्रकारे यश संपादन करता येईल व येणाऱ्या काळात एमआयएम पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून कसे आणता येईल याविषयी पक्षाच्या ध्येय धोरणावर काम करावे लागणार आहे असे मत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी चर्चा सोबत व्यक्त केले. याच बरोबर पक्षाचे मराठवाडा कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी यांनीही आगामी निवडणूका एमआयएम पक्षाला कशा पद्धतीने जिंकता येणार या बाबतीत सखोल अभ्यास, मार्गदर्शन केले. औसा तालुका एमआयएम पक्षाचे इन्चार्ज अफसर शेख यांच्या भेटीने औसा नगर पालिकेवर एमआयएम पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठीची चर्चा शहरात जोरदार सुरू असून याबाबत येणाऱ्या आगामी काळात एमआयएम पक्षाला यश मिळणार असल्याचे तालुका इन्चार्ज अफसर शेख यांनी सांगितले आहे. यावेळी दारुस्सलाम औरंगाबाद येथील बैठकीस बरकत काझी,अफजल कुरेशी, सय्यद ताहेर हुसेन, साबिर पटेल, शमशोद्दीन जरगर, फय्याज शेख यांच्यासह आदीजण उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.