आझादमध्ये 'सॉफ्ट स्किल्स'वरील राष्ट्रीयस्तर ऑनलाईन चर्चासत्र संपन्न
औसा_येथील हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित आझाद महाविद्यालयात .दि २७ जून रोजी ' सॉफ्ट स्किल्स' या विषयावर आयोजित राष्ट्रीयस्तर ऑनलाईन चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न झाले. या चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंग्रजीचे प्रा.डॉ.सामी सिद्दीकी ( मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठ हैद्राबाद) व प्रा.डॉ.दयानंद माने (इंग्रजी विभागप्रमुख,कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शंकरनगर) हे उपस्थित होते. प्रथमतः या चर्चासत्राचे उ्दघाटन नगराध्यक्ष तथा संस्था सचिव डॉ. अफसर शेख यांनी केले.यावेळी ते आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या ज्ञान व कौशल्यामध्ये भर पडावी यासाठी आम्ही सातत्याने असे उपक्रम राबवित असल्याचे सांगून यापुढेही असेच चांगले कार्यक्रम आयोजित करावे त्यास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत या चर्चासत्रास शुभेच्छा दिल्या. डॉ.सामी यांनी मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला सॉफ्ट स्किल्स आल्याच पाहिजेत हे सांगून विविध स्किल्सचे सादरीकरण सर्वासमोर सादर केले.तर डॉ.माने यांनी सॉफ्ट स्किल्स चा वापर कसा करावा व त्याचे पुढील काळात होणारे फायदे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. ई.यू.मासूमदार यांनी चर्चासत्र आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना पुढील काळात स्किलफुल व्यक्तीच स्पर्धेत टिकणार असून त्या स्किल्स कश्या अवगत कराव्या यासाठीच या मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.मन्सूरअली इनामदार तर आभारप्रदर्शन प्रा.डॉ.अमजद पठाण यांनी केले.या ऑनलाईन चर्चासत्रात देशभरातून शंभर पेक्षा जास्त प्राध्यापक सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.