विवाह नोंदणी करण्याचे अधिकार नगर परिषद यांच्याकडे द्या: जय महाराष्ट्र सेनेची मागणी

 विवाह नोंदणी करण्याचे अधिकार नगर परिषद यांच्याकडे द्या: जय महाराष्ट्र सेनेची मागणी





औसा मुख्तार मणियार

विवाह नोंदणी करण्याचे अधिकार नगर परिषद यांच्याकडे देण्यात यावे . या मागणीचे निवेदन दिनांक 28 जून 2021 सोमवार रोजी जिल्हाधिकारी यांना जय महाराष्ट्र सेनेच्या वतीने सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे. औसा शहरातील विवाह नोंदणीचे अधिकार सध्या शासकीय रुग्णालय औसा येथे देण्यात आलेला आहे. सध्याच्या कोव्हीड 19 च्या परिस्थितीमुळे शासकीय रुग्णालय औसा येथे कर्मचारी कमी पडत असल्याने, विवाह नोंदणीचे काम दोन वर्षापासून औसा शासकीय रुग्णालयात बंद ठेवण्यात आलेले आहेत. विवाह नोंदणीसाठी नोंदणी फी 700/रुपये आकार येत आहे. त्यामुळे आधार कार्ड वरील नाव दुरुस्त करण्यासाठी व इतर शासकीय कामासाठी लागणाऱ्या मॅरेज सर्टिफिकेट बनविण्यासाठी हे औसा तालुक्यातील सामान्य माणसासाठी अवघड झाले आहे. सदर विवाह नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रांमध्ये तीन साक्षीदार व मुलगा व मुलगी सोबत तिथे हजर राहण्यास सांगत आहे. सदरच्या प्रोसिजरमुळे औसा शहरातील विवाह नोंदणी असे वाटत आहे की, विवाह नोंदणी नव्हे तर खरेदी-विक्रीचे खरेदीखत चालू आहे. व तसेच विवाह नोंदणी फी म्हणून आकारली जाणारी 700/रुपये ही जास्त असल्यामुळे औसा शहरातील गोरगरीबांना परवडणारी नाही, सदरची फी रद्द करून विवाह नोंदणी ही निशुल्क करावी. व तसेच औसा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना त्यांचे गावातील विवाह नोंदणी अधिकार दिले गेलेले आहेत. परंतु औसा शहरामध्ये विवाह नोंदणीसाठी शासकीय रुग्णालयात भेट द्यावी लागत आहे.तरी जिल्हाधिकारी साहेबांना सदरील विवाह नोंदणीचे कामकाज हे औसा नगर परिषद यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन जय महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष जे पी औसेकर यांनी जिल्हाधिकारी लातूर यांना दिले आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या