विलासराव देशमुख मार्गाच्या बांधकामाचे नव्याने नियोजन करावे,
जुने रेल्वेस्टेशन येथून हा मार्ग शहरातील मुख्यरस्त्याला जोडण्यात यावा
नियोजित विलासराव देशमुख मार्ग कामाची
पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्याकडून
पाहणी, मनपाला केल्या महत्वपूर्ण सूचना
1. देशीकेंद्र शाळेजवळील पूलाची उपयोगिता तपासावी
2. लोकमान्य टिळक चौक ते देशीकेंद्र विदयालय रस्त्याचे विस्तारीकरण करावे
3. या मार्गासाठी शिवाजी चौकात अंडर पास देता येतो का याची तपासणी करावी
4. सिन्गल व्यवस्था पथदिव्याच्या व्यवस्थे बाबत नव्याने आढावा घ्यावा
5. आगामी वीस वर्षाचा विचार करून सायकल टॅक व फुटपाथची बाधणी करावी
6. वृक्षारोपन तसेच सुशोभिकरणासह रस्त्याच्या बांधकामाचे नियोजन व्हावे
लातूर प्रतिनिधी (शनिवार दि. १२ जून २१)
लातूर शहरातील वाढती वाहतूक, रहदारी व नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता शहरातल्या सम्राट चौक ते महात्मा गांधी चौक रस्ता, गंजगोलाई ते हनुमान चौक मार्गे गांधी चौक रस्ता तसेच लातूर शहरातील वाहतक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने विलासराव देशमुख मार्गाच्या बांधकामाचे नव्याने नियोजन करावे, जुने रेल्वेस्टेशन येथून हा मार्ग शहरातील मुख्यरस्त्याला जोडण्यात यावा असे निर्देश नियोजित विलासराव देशमुख मार्गाची पाहणी करून राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दि. १२ जून रोजी दुपारी संबंधितांना दिले.
पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी या पाहणी दरम्यान लातूर शहरातील वाहतक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने विलासराव देशमुख मार्गाच्या बांधकामाचे नव्याने नियोजन करावे. जुने रेल्वेस्टेशन येथून हा मार्ग शहरातील मुख्यरस्त्याला जोडण्यात यावा. देशीकेंद्र शाळेजवळील पूलाची उपयोगिता तपासावी, लोकमान्य टिळक चौक ते देशीकेंद्र विदयालय रस्त्याचे विस्तारीकरण करावे, या मार्गासाठी शिवाजी चौकात अंडर पास देता येतो का याची तपासणी करावी, सिग्नल व्यवस्था पथदिव्याच्या व्यवस्थे बाबत नव्याने आढावा घ्यावा, आगामी वीस वर्षाचा विचार करून सायकल ट्रॅक व फुटपाथची बाधणी करावी. वृक्षारोपन तसेच सुशोभिकरणासह रस्त्याच्या बांधकामाचे नियोजन व्हावे आदी निर्देश दिले यावेळी मनपा प्रशासनाला केल्या आहेत दिले आहेत.
यावेळी मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, ॲड, किरण जाधव, मनपाचे बी.बी.थोरात, ॲड.समद पटेल, झोन अधिकारी बंडू किसवे, बंटी जाधव, सिकंदर पटेल, प्रा. प्रवीण कांबळे, रणधीर सुरवसे, यांच्यासह मनपा अधिकारी तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.