*कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी यांना मारहाण करून पळून गेलेल्या आरोपीना तात्काळ अटक*
लातूर प्रतिनिधी
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे एका रुग्णाला वैद्यकीय उपचार कामी दिनांक 12/06/2021 रोजी अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार चालू असताना सदर रुग्ण मयत झाला. त्याचा राग मनात धरून मयत झालेल्या रुग्णाच्या मुलाच्या मित्राने व त्याच्या साथीदाराने अतिदक्षता विभागामध्ये कर्तव्यावर असलेले व रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरस दवाखान्यातच मारहाण केली. मारहाण करून पळून जात असताना मारहाण करणाऱ्या पैकी शुभम दिलीप नाकाडे यास तेथील सुरक्षारक्षकांनी घटनास्थळावरच पकडले व इतर व्यक्ती पळून गेले.
संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 322/2021 कलम 353,332, 504, 34 भा.द. वि . सह कलम 5 महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व कृती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृती व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध ) अधिनियम 2010 मधील कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
वरील प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील इतर पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री हिंमत जाधव ,उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण) श्रीमती प्रिया पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे , पोलीस उपनिरीक्षक किरण पठाडे व डी.बी.पथकाचे अमलदार यांचे पथक तयार करून वैद्यकीय अधिकारी यांना मारहाण करून पळून गेलेले आरोपींचा शोध घेण्या बाबत सूचना देण्यात आले त्यावरून आरोपी नामे
1) श्रीनिवास गोविंदराव ढोबे वय-25 वर्ष, राहणार- आंबाहनुमान मंदिराच्या पाठीमागे लातूर.
2) आकाश प्रमोद शेटे वय- 20 , राहणार- चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक.
3) नामदेव हनुमंत शिंदे, वय- 29 वर्ष, राहणार- व्यंकटेश नगर लातूर.
यांना रात्रीतूनच शोध मोहीम राबून लातूर शहरातील विविध ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. व गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. किरण पठाडे हे करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.