आज च्या बातम्या

 

आज च्या बातम्या



         दिनांक:-16 जून 2021





दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांने

वाढीव क्रीडा गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

लातूर ,दि.16(जिमाका):- माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत क्रीडा आयुक्तांनी सर्व जिल्‍हा क्रीडा अधिकाऱ्यांना सुचीत केलेले आहे.

कोविड-19 च्या प्रादुर्भामुळे सन 2020-21 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी साठी बाबतीत इयत्ता 8 वी व 9 वी मध्ये शिकत असताना सदर खेळाडूने विविध स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येईल.

तसेच 12 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या (खेळाडू) विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर विद्यार्थी इयत्ता 11 वी मध्ये शिकत असताना सदर खेळाडूने विविध स्तरावरील स्पर्धेतील सहभाग विचारात घेवून सन 2020-21 मध्ये क्रीडा गुणांची सवलत देण्यात येणार आहे.

तरी लातूर जिल्हयातील पात्र खेळाडू,क्रीडा शिक्षक,मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी नोंद घ्यावी व शिक्षण मंडळाचा क्रीडा सवलत गुणासाठी असलेला जुनाच फॉरमॅट वापरुन परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, लातूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत व सदर प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 21 जून 2021 आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा संकुल,औसा रोड,लातूर येथे संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.


परदेश शिष्यवृत्तीसाठी 18 जून पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ 

लातूर ,दि.16(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती,नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुलां-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होय.सन 2021-22 या शैक्षणिक वर्षा करीता विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्यास दिनांक 18 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत  महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. साठी अद्ययावत (Qx World University Ranking ) 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा.

सदर परिपुर्ण अर्ज swft.applictaions.2122@gmail.com  या ईमेलवर पाठवून त्याची हार्डकॉपी विहीत मुदतीत व आवश्यक ते कागदपत्रासह समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य,पुणे-411001 या पत्त्यावर सादर करावा.सदर योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे,परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता,आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत.एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागु राहणार नाही.

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यांदा असेल.भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील MD व  MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.वार्षिक उत्पन्न रु. 6 लाखापेक्षा जास्त नसावे.अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी.

या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन आयुक्त,समाज कल्याण,आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य ,पुणे डॉ.प्रशांत नारनवरे यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                      


बेवारस दुचाकी वाहनांसाठी

एमआयडीसी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा

 

लातूर ,दि.16(जिमाका):- लातूर शहर व जिल्हा परिसरातील जनतेस या जाहीर प्रगटनाव्दारे सुचित करण्यात येते की, पोलीस स्टेशन एमआयडीसी लातूर हद्दीमधील नमुद केलेले दुचाकी वहाने त्यांचा प्रकार नोंदणी क्रमांक,इंजिन नंबर व चेसिस नंबर असे बेवारस स्थितीत मिळुन आल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 82 प्रमाणे कार्यवाही करुन ताब्यात  घेण्यात आलेले आहेत.

सदरील बेवारस मोटार सायकल/ दुचाकींवर ज्या कोणा व्यक्तीचा मालकी हक्क असेल त्या व्यक्तीने हे जाहीर प्रगटन प्रसिध्द झाल्यापासून दोन महिण्याच्या आत कायदेशीर मालकी संबंधाचे कागदपत्र पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन एमआयडीसी लातूर यांच्याकडे सादर करावेत.

विहीत मुदतीमध्ये कोणाचीही मालकी हक्क सिध्द नाही झाल्यास कोणाचीही काही तक्रार नाही असे गृहीत धरुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 87 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 458 प्रमाणे कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन  पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी.लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                           ****


 

*महानगरपालिके मार्फत 45 वर्ष पुढील

वयोगटासाठीचे लसीकरण पाच केंद्रावर होणार*

 

लातूर,दि.16(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 17 जून 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी  पुढील प्रमाणे आहे. 45 वर्षे पुढील वयोगटासाठीचे  लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे, 18 ते 44 वर्ष वयोगटासाठी लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आलेले नाही. नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील,अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.

विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर,दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर) विवेकानंद प्रा.विदयामंदिर (शिवाजी शाळा प्रांगण),लेबर कॉलनी लातूर व यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली, लातूर येथे कोव्हॅक्सीन व कोव्हीशिल्ड  लस दिली जाणार आहे.

            कोविशिल्ड 45 वर्षेावरील  नागरीकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेऊन 84 दिवस पुर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील ) HCW व FLW यांचा पहिला व दुसरा डोस ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील.

             शहरातील  इतर लसीकरण केंद्र दि. 17 जून 2021 रोजी बंद राहतील याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                                           ***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या