माझं लातूर कोविड मदत केंद्राच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास
उत्स्फूर्त प्रतिसाद
उत्स्फूर्त प्रतिसाद
५४ रक्तदात्यांनी केले ऐच्छिक रक्तदान
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी स्वतः रक्तदान करून केले शिबिराचे उद्घाटन
लातूर : आपल्या आगळ्या वेगळ्या सेवाकार्याने संपूर्ण राज्याचे लक्ष
वेधून घेणाऱ्या माझं लातूर कोविड मदत केंद्राच्या वतीने बुधवारी आयोजित
करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान
शिबिरात एकूण ५४ रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदान केले. या शिबिराचे
उद्घाटन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वतः रक्तदान करून केले.
या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महापौर विक्रांत
गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांसह माझं लातूर परिवारातील
सदस्यांची उपस्थिती होती. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माझं लातूर
परिवाराच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.
धन्वंतरी पूजनाने शिबिरास प्रारंभ झाला. माझं लातूर कोविड मदत
केंद्राच्या वतीने अल्पावधीतच रक्तदान शिबिराचे आयोजन करून ते अत्यंत
यशस्वी करून दाखवले. माझं लातूर कोविड मदत केंद्राच्या सर्व सदस्यांनी
आपण सर्वांनी एकत्रित येऊन एखादा सामाजिक उपक्रम किती प्रभावीपणे पार
पाडू शकतो, हे दाखवून दिले आहे. या रक्तदान शिबिरात एकूण ५४ रक्तदान
करून समाजाप्रती असलेली आपली आस्था दाखवून दिली. या रक्तदान शिबिरात
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांसह माझं लातूर परिवारातील अभय मिरजकर,
सतीश तांदळे, विजय स्वामी, एजाज शेख, बाबुराव खंदाडे, काशिनाथप्पा
बळवंते , महेश पिंपळे, प्रशांत मुसळे, सौ. सुवर्णा अभय मिरजकर, सौ.
मीनाक्षी श्रीधर स्वामी, सोमेश श्रीधर स्वामी, सौ. ज्योती सतीश तांदळे,
गोपाळ जडे, तेजस चिकटे, सौ. राणीताई देशपांडे, कु. स्नेहा संजय भिसे,
सागर संजय भिसे, दीपक बाचे , सुरज स्वामी आदिंसह एकूण ५४ जणांनी रक्तदान
केले.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी अभय मिरजकर, सतीश तांदळे, एड. बळवंत
जाधव, एड. प्रदीप मोरे, प्रमोद गुडे, गोपाळ झंवर, दीपरत्न निलंगेकर,
राहुल मातोडकर , रवी पिचारे, डॉ. सितम सोनवणे , राजेश तांदळे, रत्नाकर
निलंगेकर, जुगलकिशोर तोष्णीवाल, श्रीधर स्वामी, काकासाहेब शिंदे, उमेश
कांबळे, अजय वाघमारे, डॉ. भाग्यश्री झुमर , दीपक मिरकले, संजय स्वामी,
भास्कर कुंभार, भाग्यश्री झंवर यांसह माझं लातूर परिवारातील सर्व
सदस्यांनी परिश्रम घेतले. रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते
प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
-------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.