स्पंदन" ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भारती-गीते ग्रुप ची एक लाखाची मदत .

 

स्पंदन" ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भारती-गीते ग्रुप ची एक लाखाची मदत .






लातूर(प्रतिनिधी) कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाची लागण झालेल्या अनेक रुग्णांना ऑक्सिजनची  गरज भासत आहे. ऑक्सिजन  वेळेत न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण गेले आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकार कडून अनेक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभी केली जात आहेत. तसेच सामाजिक जाणिवा लक्षात घेत अनेक सेवाभावी संस्थेंच्या  वतीने स्वतःचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारले जात आहेत याचाच एक भाग म्हणून डॉ. विश्वास कुलकर्णी यांच्या पुढाकारातुन लातूर येथे स्पंदन ऑक्सिजन  निर्मिती प्रकल्प उभा राहत आहे.या सामाजिक कार्यात आपलाही खारीचा वाट असावा या सामाजिक जाणिवेतून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे क्रेडाई संघटनेचे राज्य विस्तारक तथा निश्चल पुरी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रसिद्ध युवा बांधकाम व्यावसायिक धर्मवीर भारती व नागनाथ गीते यांनी भाराती-गिते ग्रुप च्या  वतीने स्पंदन ऑक्सिजन  निर्मिती प्रकल्पाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. एका छोटेखानी कार्यक्रमात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला. यावेळी  व्यासपीठावर स्पंदन ऑक्सिजन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. विश्वास कुलकर्णी,अँड संजय पांडे, डॉ. आरदवाड, डॉ.संजय आयाचित सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी आदींची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. याहीपुढे भविष्यामध्ये गरजूंसाठी शक्यती मदत केली जाईल असे प्रतिपादन धर्मवीर भारती व नागनाथ गीते यांनी याप्रसंगी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या