रज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या स्कॉलरशीप वाटपाला मिळाली गती
माजी आ.कव्हेकरांच्या प्रयत्नाला यश ः स्कॉलरशीपधारकाकडून आभार
लातूर दि.10-06-2021
महाराष्ट्र राज्यातील पॉलिटेक्निक, नर्सिंग, इंजिनियरींग व मेडीकलच्या विद्यार्थ्यांची 2020-21 ची स्कॉलरशीप निधीअभावी रखडलेली होती. याबाबत भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीई कास्टच्या 200 कोटी पेक्षा जास्तीच्या प्रलंबीत असलेल्या स्कॉलरशीप व एस.सी.कास्टच्या विद्यार्थ्यांचे राज्यातील कॉलेजचे 354 कोटी 88 लाख 95 हजार 394 रूपये अशा एकूण 554 कोटी 88 लाख 95 हजार 354 रूपयांच्या शिष्यवृत्ती वाटपाला गती मिळालेली आहे. त्यामुळे ओबीसीसह इतर स्कॉलरशीपधारक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे स्कॉलरशीपधारक विद्यार्थ्यांकडून भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्रातील पॉलिटेक्निक कॉलेज, नर्सिंग, इंजिनियरींग मेडीकल कॉलेज विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप सन 2020-21 साठीचा मार्च अगोदरच निधी उपलब्ध नसल्यामुळे स्कॉलरशीप मिळालेली नव्हती. तर ओबीसी, व्हिजेएनटी , एसबीई कास्टची 200 कोटीची स्कॉलरशीप मार्च महिण्यात बँकेत जमा करूनही दोन महिण्यापासून (पीएफएमएस) ऑनलाईन पेमेंट ट्रांन्सफर नियमात बदल झाला व त्याला दिल्ली पीएफएमएस विभागाची मान्यता लागते ती अद्याप मिळाली नसल्यामुळे आम्ही पैसे असूनही वाटप करू शकलेलो नाही. अशी माहिती महा आय.टी.विभागाचे अधिकारी यशवंत सावंत व इतरांनी दिली. त्यामुळे दिल्ली “पीएफएमएस” चे जॉईंट सेक्रेटरी श्री.श्रीवास्तवजी यांच्याशी फोनवरती बोलून पीएफएमएसला त्वरीत मान्यता द्यावी. यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळू शकेल, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते तथा मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली. व त्या मागणीला त्वरीत मान्यता देण्याची हमी श्रीवास्तव यांनी दिली. यामुळे ओबीसी व इतर विद्यार्थ्यांना 200 कोटी पेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे. या रक्कमेमुळे राज्यातील सर्व कॉलेजना मदत होणार आहे.
अशाच पध्दतीने एस.सी.कास्टच्या विद्यार्थ्यांचे राज्यातील कॉलेजचे 354 कोटी 88 लाख 95 हजार 394 रूपये एसबीआय बँकेत जमा असूनही मिळत नव्हते. शासनाने 50 कोटीच्यापुढे निधी ट्रांन्सफर करावयाचा असल्यास त्या खात्याला एल.ई.टी.नंबर मिळाल्याशिवाय पैसे ट्रांन्सफर होत नाहीत असे सांगितले होते. यासाठी समाजकल्याण आयुक्त,पुणे डॉ.श्री.नारनवरे साहेब, चिफ अकौंट ऑफीसर लोकापल्ले व मुंंबई एस.बी.आय.बँकेला सतत 8 दिवस संपर्क करून पाठपुरावा केल्यामुळे पैसे ट्रांन्सफर करण्याचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे 2 दिवसापासून राज्यातील सर्व कॉलेजच्या एस.सी. विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळणे सुरू झाले असल्याची माहिती मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली. शासकीय कामात काही अधिकारी तळमळीने प्रयत्न करतात. तर काही अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे जनतेच्या कामांना योग्य असूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीपच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करावा लागतो, असेही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यावेळी बोलताना म्हणाले.
-----
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.