कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन


कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन





लातूर,दि.10(जिमाका):- राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत देण्यात येतात.यामध्ये शेती क्षेत्राशी संबंधीत उदयान पंडीत,डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार,वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार,जिजामाता कृषीभुषण पुरस्कार,वसंतराव नाईक शेतीमीत्र पुरसकार,वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार,कृषभुषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार,पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा रत्न पुरस्कार,युवा शेतकरी पुरसकारआणि उत्कृष्ठ कृषि संशोधक पुरस्कार इ.पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

यासाठी शेतकरी / शेतकरी गट / कृषी संलग्न संस्था पात्र आहेत.तरी इच्छुक शेतकरी / शेतकरी गट / संस्थांनी आपले प्रस्ताव 30 जुन पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे सादर करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ,लातूर यांनी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

विविध कृषि पुरसकाराच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध्‍ आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहायक,कृषी पर्यवेक्षक,तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे कळविले आहे.                                             

वृत्त क्र.444                                                                       दिनांक:-10 जून 2021

 

नेहरु युवा केंद्र लातूर मार्फत राष्ट्रीय युवा

स्वयंसेवक निवडीसाठी मुलाखतीचे आयोजन 

लातूर,दि.10(जिमाका):-युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत व नेहरु केंद्र लातूर मार्फत जिल्हयातील युवक मंडळामार्फत ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आायेजन केले जाते.युवक मंडल व नेहरु युवा केंद्र कार्यालयात योग्य तो समन्वय राहावा या उद्देशाने प्रत्येक तालुक्याला 2 राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांची प्रतिमाह रु. 5 हजार मानधन तत्वावर  नियुक्ती  करण्यात येते.

या पदासाठी इच्छुक उमेवारांकडून अर्ज यापुर्वीच ऑनलाइ्रन अर्ज मागविण्यात आले असुन मुलाखतीचे आयोजन दिनांक 14 ते 16 जून 2021 या कालावधीत बहुउद्देशिय इमारत,जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे आयोजित करण्यात आले आहे.उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे पुढील प्रमाणे तालुकानिहाय मुलाखत घेण्यात येणार आहे.

दिनांक 14 जून 2021 रोजी लातूर ,रेणापूर व देवणी तालुका, दिनांक 15 जून 2021 रोजी उदगीर,अहमदपुर,जळकोट व शिरुर अनंतपाळ तालुका व दिनांक 16 जून 2021 रोजी औसा,निलंगा व चाकुर तालुका आहे.

तरी ज्या उमेदवारांनी सदरील पदासाठी ऑनलाईन अर्ज केले आहे फक्त त्याच उमेदवारांनी वरील प्रमाणे नियोजित दिवशी बहुउद्देशिय इमारत जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांनी केले आहे. 

वृत्त क्र.445                                                                         दिनांक:-10 जून 2021

शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन करावेत

विभागीय नियंत्रक यांचे आवाहन 

लातूर,दि.10(जिमाका):-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,लातूर विभाग,लातूर मध्ये सन 2021-22 सत्रासाठी वेगवेगळया व्यावसायाकरीता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 50 पदे ऑनलाईन पध्दतीने पद / जागा निश्चित करण्यात आले असुन त्यानुसार एकुण 50 जागा (यांत्रिकी मोटारगाडी ( एमएमव्ही)-36, विजतंत्री (ईलेक्ट्रीशियन)-07, सांधाता (वेल्डर) (गॅस अँन्ड ईलेक्ट्रीकल)-01, मोटारगाडी साठाजोडारी (एमव्हीबीबी) (शिट मेटल वर्क्स) 05, पेंन्टर -01,अशी एकुण 50) जागा / पदे भरावयाची आहेत.वर दर्शविण्यात आलेल्या व्यवसायातील आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम MIS वेब पोर्टलवरील www.apprenticeship.gov.in या वेबसाईटवर दि.10 जून 2021 ते 24 जून 2021 वेळ 11.00 वाजेपर्यंत ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करुन MSRTC Division Latur  या आस्थापन (Establishment)  करीता ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.

त्यामुळे या ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केलेल्या शिकाऊ उमदवारीकरीता इच्छुक‍ असणाऱ्या उमेदवारांना या कार्यालयाचा छापील नमुण्यातील अर्ज भरण्याची तारीख दिनांक 25 जून 2021 ते 30 जून 2021 वेळ 15.00 वाजेपर्यंत  करण्यात आली आहे.सदरचे छापील अर्ज रा.प.विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका,अंबाजोगाई रोड,लातूर (आस्थापना शाखा)येथे दिनांक  25 जून 2021 ते 30 जून 2021 रोजी वेळ 15.00 वाजेपर्यंत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळुन मिळतील व लगेच स्विकारले जातील.

सदरहु अर्जाची किंमत (GST 18%सहित) खुल्या प्रवर्गाकरीता रुपये 590/- व मागासवर्गीयांसाठी रुपये 295/- आहे. त्याप्रमाणे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी MSRTC Found Account Latur या नावाने रु. 590/- चा व मागासवर्गीय उमेदवारांनी रु.295/- चा धनाकर्ष किंवा आय.पी.ओ. (इंडियन पोस्टल ऑर्डर ) अर्ज घेतेवेळी सोबत आणणे आवश्यक आहे. दि. 10 जून 2021 पुर्वी व दि. 24 जून 2021 रोजी वेळ 11.00 नंतर ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व ते रद्द समजले जातील व त्यांना या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज देण्यात येणार नाही.

जे उमेदवार दि.30 जून 2021 रोजी वेळ 15.00 वाजेपर्यंत या कार्यालयाचे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणार नाहीत त्यांचा शिकाऊ उमेदवार भरतीसाठी विचार केला जाणार नाही.असे विभाग नियंत्रक रा.प. लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 वृत्त क्र.446                                                                    दिनांक:-10 जून 2021

 

वृक्ष आणि बांबू लागवडीचे काम

 युद्धस्तरावर सुरू करा

मार्गदर्श्न कार्यशाळेत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांचे निर्देश

लातूर,दि.10(जिमाका) शेतक-यांचे उतपन्न दुप्पट करण्यासाठी बांबू हे एक महत्वाचे घटक आहे.मॉन्सूनच्या काळात बांबूची लागवड करणे अतिशय फायदेशीर ठरते.पारंपरिक शेती मुळे शेतक-यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग म्हणून राज्य शासनाकडून शेतक-यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे या योजनांशी शेतक-यांना जोडून त्यांचा उद्धार करण्याची ही सुवर्ण संधी आहे तेंव्हा जिल्ह्यात वृक्ष आणि बांबू लागवडीचे काम युद्धस्तरावर सुरू करून प्रत्येक तालुक्याने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त संख्येने लागवड करण्याचे नियोजन करून ही कामे युद्धस्तरावर सुरू करावीत असे निर्देश जिल्ह्याधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी बांबू आणि वृक्ष लागवड बाबत मार्गदर्श्न कार्यशाळेप्रसंगी उपस्थित अधिका-यांना  दिले.

ही कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डी.पी.डी.सी सभागृहात आयोजित करण्यात आली.यावेळी माजी विधान परिषद सदस्य पाशा पटेल, उपजिल्ह्याधिकारी (रोजगार हमी योजना) शोभा जाधव,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, संतोष जोशी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पं)उदयसिंह साळुंके,जिल्हा रेशीम अधिकारी श्री.बावगे ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्र्य गवसाने,विभागीय वन अधिकारी उस्मानाबाद श्री.गायकर ,विभागीय वन अधिकारी (सामजिक वनीकरण,लातूर) व जिल्ह्यातील सर्व तहसीलदार,गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,आदि उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी पृथ्वीराज पुढे म्हणाले या वर्षी लातूर जिल्ह्याला 1 कोटी 43 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे त्यामुळे  हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपल्या पूर्ण क्षमतेने प्रयत्ने करणे आवशयक आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येईल असेही ते म्हणाले. सन 2021 च्या पावसाळ्यात वृक्षलागवडीचे औरंगाबाद महसूली विभागातील 8 जिल्ह्यांना यंत्रणानिहाय उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेले आहे.  त्यानूसार लातूर जिल्ह्याकरीता 21 लाख 9 हजार 700 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट 45 यंत्रणेस ठरवून दिले आहे.असेही त्यांनी सांगितले

बांबू ही एक बहुउपयोगी वनस्पती असून आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे; म्हणून बांबूचा समुचित विकास करणे; तसेच बांबूच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग गरीब जनतेच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता करणे व त्यायोगे संपूर्ण देशाचा विकास साधण्याकरिता केंद्र शासनाने राष्ट्रीय बांबू अभिया ची स्थापना केलेली आहे.कोणतीही व्यक्ती/संस्था लाभार्थी म्हणून या योजनेसाठी पात्र राहील.इच्छूक लाभधारकांच्या नावाने (व्यक्ती/संस्था) जमीन असणे आवश्यक आहे.

लाभधारकाने 7/12 चे उतारे अर्जासोबत जोडावे.बांबू लागवडीकरिता लाभधारकाकडे पाण्याची व्यवस्था, शेतास कुंपण असणे आवश्यक राहील.सामुदायिक क्षेत्रावर (वनेत्तर पडीक क्षेत्र/संस्था/ट्रस्ट) जागेवर संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन त्या क्षेत्रांवर बांबू लागवड करता येईल.वैयक्तिक लाभार्थीस तीन हप्त्यात अनुदानाची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. प्रथम वर्ष लागवडीकरिता 50 टक्के, दुसऱ्या वर्षाकरिता 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षाकरिता 20 टक्के अनुदान वित्तीय वर्षाच्या शेवटी जमा करण्यात येईल.बांबू लागवडीकरिता टिश्यू कल्चर (उती संवर्धन) ची रोपे लागवड करणे बंधनकारक राहील.अशी माहिती विभागीय वन अधिकारी श्री.गायकर यांनी दिली.

यावेळी विधान परिषदेचे माजी सदस्य पाशा पटेल यांनी उपस्थितांना बांबू लागवडीबाबत सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले बांबूची अभिवृद्धीसाठी दोन पद्धती बियाण्यांपासून अभिवृद्धी आणि कंदाद्वारे अभिवृद्धी असतात तसेच मॉन्सूनच्या काळात जून -जुलै महिन्यात बांबूची लागवड करावी. लागवडीचे अंतर - काही पीके घेताना त्याच्या लागवडीचे गणित असते. बांबूची लागवड करताना काही अंतराचे नियम पाळावे लागतात. बांबूच्या जातीनुसार दोन रोपातील अंतर वेगवेगळे असते.

बांबूच्या पिकाचा कालावधी ३५ ते ४० वर्षापर्यंत असल्यामुळे जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. त्यामुळे बांबूची चांगली वाढ होते.यावेळी त्यांनी लागवड केल्यानंतर घ्यावयाची काळजी, खुरपणी , बांबूसाठी पाणी व्यवस्थापन कसे असावे, बांबूची छाटणी, बांबू लागवडीचे फायदे यावर सविस्तर मारगदर्शन करून त्यांनी शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्याचे आवाहन केले.

कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात जिल्हाधिका-यांनी उपस्थित प्रत्येक तालुक्यातील सर्व तहसीलदार,गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,आदि यांच्याकडून जिल्ह्यातील वनक्षेत्र,वृक्ष लागवड,फळबाग याविषयांबाबत थोडक्यात सद्यस्थिती आढावा घेतला व आवश्यक सूचना दिल्या.उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी उपस्थित अधिका-यांना वृक्ष आणि बांबू लागवड विषयी  जिल्हाधिकारी यांचा मानस पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करण्याचे आवाहन केले व उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले.                                                                                                                                       

वृत्त क्र.447                                                                        दिनांक:-10 जून 2021

 

जिल्ह्यात 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण

सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत सुरु राहणार

 

लातूर,दि.10(जिमाका):-लातूर जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 11 जून 2021 रोजीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र- उपजिल्हा रुग्णालय उदगीर, पहिला व दुसरा कोविशिल्ड, व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय औसा,पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय चाकूर, पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट ग्रामीण रुग्णालय देवणी पहिला व दुसरा कोविशिल्ड  व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट,  ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट,ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट व  जिल्हयातील  सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट डोस  सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु राहणार. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सीनचा केवळ दुसरा डोस लसीच्या उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे.

45 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध्‍ साठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 11 जून 2021 रोजी कोवीशिल्ड/कोव्हॅक्सीन लसीचे लसीकरण करण्यात येत आहे.

लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. गंगाधर परगे यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.                                                    

वृत्त क्र.448                                                                      दिनांक:-10 जून 2021

 

*महानगरपालिके मार्फत 45 वर्ष पुढील

वयोगटासाठीचे लसीकरण पाच केंद्रावर होणार*

लातूर,दि.10(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 11 जून 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी  पुढील प्रमाणे आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटांसाठी लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आलेले नाही. 45 वर्षे पुढील वयोगटासाठीचे  लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे, नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील.कोविशिल्ड लस उपलब्ध्‍ ठेवण्यात आलेली नाही अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.

विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर,दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर) विवेकानंद प्रा.विदयामंदिर (शिवाजी शाळा प्रांगण),लेबर कॉलनी लातूर व यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली, लातूर येथे कोव्हीशिल्ड  लस दिली जाणार आहे.

           45 वर्षेावरील नागरीकांचा कोविशिल्ड लसीचा  पहिला  व दुसरा डोस (पहिला डोस घेवून 84 दिवस पुर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील ) HCW व FLW यांचा पहिला व दुसरा डोस ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील.

           शहरातील  इतर लसीकरण केंद्र दि. 11 जून 2021 रोजी बंद राहतील याची नागरीकांनी नोंद घ्यावी  असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                                           ***

 

 

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या