शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन करावेत विभागीय नियंत्रक यांचे आवाहन


शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन करावेत

विभागीय नियंत्रक यांचे आवाहन





लातूर,दि.10(जिमाका):-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,लातूर विभाग,लातूर मध्ये सन 2021-22 सत्रासाठी वेगवेगळया व्यावसायाकरीता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 50 पदे ऑनलाईन पध्दतीने पद / जागा निश्चित करण्यात आले असुन त्यानुसार एकुण 50 जागा (यांत्रिकी मोटारगाडी ( एमएमव्ही)-36, विजतंत्री (ईलेक्ट्रीशियन)-07, सांधाता (वेल्डर) (गॅस अँन्ड ईलेक्ट्रीकल)-01, मोटारगाडी साठाजोडारी (एमव्हीबीबी) (शिट मेटल वर्क्स) 05, पेंन्टर -01,अशी एकुण 50) जागा / पदे भरावयाची आहेत.वर दर्शविण्यात आलेल्या व्यवसायातील आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम MIS वेब पोर्टलवरील www.apprenticeship.gov.in या वेबसाईटवर दि.10 जून 2021 ते 24 जून 2021 वेळ 11.00 वाजेपर्यंत ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करुन MSRTC Division Latur  या आस्थापन (Establishment)  करीता ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.

त्यामुळे या ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केलेल्या शिकाऊ उमदवारीकरीता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या कार्यालयाचा छापील नमुण्यातील अर्ज भरण्याची तारीख दिनांक 25 जून 2021 ते 30 जून 2021 वेळ 15.00 वाजेपर्यंत  करण्यात आली आहे.सदरचे छापील अर्ज रा.प.विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका,अंबाजोगाई रोड,लातूर (आस्थापना शाखा)येथे दिनांक  25 जून 2021 ते 30 जून 2021 रोजी वेळ 15.00 वाजेपर्यंत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळुन मिळतील व लगेच स्विकारले जातील.

सदरहु अर्जाची किंमत (GST 18%सहित) खुल्या प्रवर्गाकरीता रुपये 590/- व मागासवर्गीयांसाठी रुपये 295/- आहे. त्याप्रमाणे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी MSRTC Found Account Latur या नावाने रु. 590/- चा व मागासवर्गीय उमेदवारांनी रु.295/- चा धनाकर्ष किंवा आय.पी.ओ. (इंडियन पोस्टल ऑर्डर ) अर्ज घेतेवेळी सोबत आणणे आवश्यक आहे. दि. 10 जून 2021 पुर्वी व दि. 24 जून 2021 रोजी वेळ 11.00 नंतर ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व ते रद्द समजले जातील व त्यांना या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज देण्यात येणार नाही.

जे उमेदवार दि.30 जून 2021 रोजी वेळ 15.00 वाजेपर्यंत या कार्यालयाचे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणार नाहीत त्यांचा शिकाऊ उमेदवार भरतीसाठी विचार केला जाणार नाही.असे विभाग नियंत्रक रा.प. लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.


                                              *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या