*कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना आधार ठरला लोकाधिकार संघ.*
~~~~~~~~~~~~~~~~
*{ लिंबराज कुंभार }*
संकट काळात धावून येणारे फार कमी लोक असतात. कोरोना सारख्या महामारी मध्ये अनेकदा जवळचे नातेवाईकपण मदतीला आले नाहीत. असा अनुभव अनेकांना आलेला आहे. मात्र लातूरला कोरोना रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना लोकाधिकार संघाचा मोठा आधार मिळालाआहे.
लोकाधिकार संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते तथा लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी १५० पेक्षा अधिक रुग्णांना लातुर, संभाजीनगर (औरंगाबाद), सोलापूर, पुणे, ठाणे आदी ठिकाणी रुग्णालयात बेड मिळवून दिले आहेत. समाज कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी कांही सहकाऱ्यांसह कोरोनाच्या या भयाण परिस्थितीमध्ये जनतेच्या मदतीसाठी व सर्वसामान्यांचे अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी *" लोकाधिकार संघ "* या महाराष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेची स्थापना श्री. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी दि. १२ जानेवारी २०२१ रोजी केली. तेंव्हापासून सदासर्वकाळ व्यंकटराव पनाळे आणि लोकाधिकार संघ जनसेवेत सक्रीय कार्यरत आहेत.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये लातूर महानगरात रुग्णांच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन लोकाधिकार संघाचे प्रत्येक तालुक्याला कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी दोन प्रतिनिधी नियुक्त करून त्यांच्यावर कामाची जबाबदारी दिली. आणि या प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी लोकाधिकारचे लातूर जिल्हाप्रमुख विरनाथ अंबुलगे, कोरोना रुग्ण व नातेवाईक मदत केंद्राचे प्रकल्पप्रमुख संतोष पनाळे व स्वतः लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे हे जातीने लक्ष देत असत. सर्व तालुक्यांच्या प्रतिनिधींचे मोबाईल नंबर वर्तमानपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले होते. रुग्णांचे नातेवाईक कोणतीही अडचण असेल तर या प्रतिनिधींशी मोबाईल वर संपर्क करुन ते आपली आडचण सांगत असत. रुग्णांना बेड मिळवणे संदर्भातील अडचणी सर्वात जास्त असायच्या. व्यंकटराव पनाळे यांनी त्यांच्या हरंगुळ (बु) येथील कार्यालयाचे रूपांतर कोविड मदत केंद्रा मध्येच केले होते. तेथे त्यांनी लातुरच्या सर्व कोविड हॉस्पिटलची यादी बनवून कोणत्या हॉस्पिटलला किती व्हेंटिलेटर बेड आहेत. किती ऑक्सिजन व जनरल बेड आहेत. आणि हॉस्पिटलला कोणाशी संपर्क करायचा. हे सर्व अद्ययावत ठेवले होते.
कोविड मदत केंद्र रूम मधूनच सर्व प्रतिनिधींशी संपर्क चालू असायचा. रूम मध्ये संतोष पनाळे, गणेश सगर, डॉ. राम गजधने, व इतर नेमून दिलेली कार्यकर्ते बसून असायचे. आणि फोनवरूनच त्यांच्यावर दिलेल्या जबाबदारीचे सर्व कामे करायचे. आणि इतर पदाधिकारी गरजेनुसार प्रत्यक्ष हॉस्पिटलला जाऊनही रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत करायचे.
लोकाधिकार संघाने ज्या रुग्णांना मदत केली त्यामध्ये सर्वाधिक नागरीक हे कष्टकरी, मजूर, हमाल आणी गरीब परिस्थिती असलेले होते. ही सेवा २४ तास चालू होती. या सर्व कामासाठी लातूर महानगरपालिकेच्या कोविड हॉस्पिटल अपडेट वेबसाईटची मदत झाली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे दि. ३० एप्रिल २०२१ पासून लातूर शहरात उपचारासाठी संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळेला जेवणाचे डब्बे निशुल्क पोहोचवण्याचे काम व्यंकटराव पनाळे यांनी केले आहे. याकरिताही त्यांनी प्रत्येक कोविड हॉस्पिटलच्या बाहेर लोकाधिकार संघाचे बॅनर लावून रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी मोबाईल नंबर दिले होते. त्या नंबर वर रुग्णांचे नातेवाईक संपर्क करायचे. कोणाचाही फोन आला कि अर्धा ते एक तासात रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनाचे डबे पोहोंच केले जायचे. या कामासाठी ही हरंगुळ चे दत्ता माळी, राम पंडगे व इतर पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली.
तसेच हे सर्व कार्य चालू असताना रुग्णांचे नातेवाइक हॉस्पिटलच्या बाहेर कुठेही फुटपाथवर झोपलेले पाहून लोकाधिकार संघाने निर्णय घेतला की रुग्णांच्या नातेवाइकांची राहण्याची सोय केली पाहिजे. त्याकरिता बोळेगावकर मंगल कार्यालयाचे प्रशांत बोळेगावकर यांना भेटून त्यांचे आई-वडील सौ. शोभाताई बोळेगावकर व सिद्धलिंगाप्पा बोळेगावकर यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर बोलणे झाल्यानंतर बोळेगावकर परिवाराने त्यांनी त्यांचे बोळेगावकर मंगल कार्यालय निशुल्क लोकाधिकार संघाला दिले. आणि त्यांच्या सहकार्यामुळेच दिनांक १५ मे २०२१ पासून त्या मंगल कार्यालयातच रुग्णांच्या नातेवाइकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था सुरू झाली. या कामासाठी प्रशांत बोळेगावकर, शोभाताई बोळेगावकर, सिद्धलिंगाप्पा बोळेगावकर यांची मोलाची साथ आणि सर्वतोपरी सहकार्य लोकाधिकार संघाला मिळाले.
लातुर शहरात कोविड रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना कोरोना महामारी च्या संकट काळात आधार देणारा हा उपक्रम चालवण्यासाठी लोकाधिकार संघाचे लातूर जिल्हाप्रमुख विरनाथ अंबुलगे, जिल्हा उपप्रमुख माधवराव तोंडारे, कोविंड रुग्ण व नातेवाईक सेवा प्रकल्पप्रमुख संतोष पनाळे, डॉ. राम गजधने, शिवदास बुलबुले, दयानंद चव्हाण, सादिक शेख, पवन कांबळे, महादेव जगदाळे, आशिष पावले, रामेश्वर पाटील, तानाजी खिचडे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपला अमूल्य असा वेळ देवुन सहकार्य केले. काही वेळेला तर स्वतः व्यंकटराव पनाळे यांनी आपल्या स्विफ्ट कारमधून सिव्हिल हॉस्पिटलला रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाइकांना डब्बे पोहोंच केले आहेत. परंतु हे सर्व करत असताना व्यंकटराव पनाळे यांनी सर्व लोकाधिकारच्या पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या होत्या, भोजनाचे डब्बे देतानाचे अथवा वाटप करत असतानाचे फोटो किंवा व्हिडिओ काढायचे नाहीत. व ते सोशल मीडियावर प्रसारित करायचे नाहीत. त्यामुळे हे ईश्वरी कार्य समजून लोकाधिकार संघाच्या सर्व टीमने केलेले कार्य हे या महामारीच्या काळात कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आधार व दिलासा देणारे ठरले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी गोरगरीब लोकांचे तसेच पाल ठोकून राहिलेल्या भटक्या विमुक्तांची उपासमार होण्याची वेळ आली. अशा वेळी कांही सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार रामराव गवळी, शिवाजी कांबळे, राजेंद्र वनारसे, शरद झरे, बाळ होळीकर आदींनी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्याशी संपर्क करून या गोरगरीब लोकांना धान्य पुरवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तेंव्हा लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी लातूर येथील त्यांचे मित्र व्यापारी मनोज देशमाने हरंगुळ येथील हाजी इमाम उर्फ बाबा शेख इत्यादींशी संपर्क करून त्यांच्या सहकार्याने या सर्व गरीब कुटुंबांना एक महिना पुरेल असे धान्याचे किट वाटप केले. एकूणच लोकाधिकार संघाने कोरोनाच्या कालावधीमध्ये सामाजिक बांधिलकी जपून हे केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. लोकाधिकार संघाची ही चळवळ भविष्यात महाराष्ट्रव्यापी झालेली दिसेल.
- *{ लिंबराज कुंभार }*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.