पर्यावरण दिनानिमित्त मनपाच्या आवारात वृक्षारोपण
लातूर/प्रतिनिधी:जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लातूर महानगरपालिकेच्या मुख्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण रक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन करणे ही आज काळाची गरज बनलेली आहे. वातावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची आवश्यकता आहे.या नागरिकांनाही वृक्ष लागवडीची प्रेरणा मिळावी या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला.
महापालिका मुख्यालयाच्या परिसरात महापौर विक्रांत गोजमगुंडे,उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,आयुक्त मित्तल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे,आस्थापना प्रमुख रमाकांत पिडगे,प्रमुख स्वच्छता निरीक्षक शेख कलीम,उद्यान विभाग प्रमुख माने,सहाय्यक पिटले व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.