वृक्ष लागवड चळवळ उभी करण्यासाठी सहभाग नोंदवावा
लातूर,दि.2(जिमाका):-जिल्हयात वृक्ष लागवड चळवळ उभी करण्यासाठी वृक्ष प्रेमी नागरीक तसेच सेवाभावी संस्थांनी आपला सहभाग नोंदवावा असे अवाहन अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी केले.
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात आयोजित वृक्ष लागवड पुर्व तयारी बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.साळुंखे, लातूर ग्रीन वृक्ष टिमचे डॉ.पवन लड्डा,इम्रान सय्यद,वनश्री मित्र मंडळाचे इश्वर बाहेती, वृक्ष प्रतिष्ठानच्या सुनंदा जगताप,बी.एम.काळूंके उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे म्हणाले की, जिल्हयात वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येणार असून वृक्ष लागवड करण्यासाठी जिल्हयातील वृक्ष प्रेमी नागरीक,सेवा भावी संस्थांनी सहभाग नोंदवीणे नितांत गरजेचे आहे.जिल्हयात एक व्यक्ती एक वृक्ष ही मोहिम राबवून वृक्ष लागवड करण्याचा संकल्प असून या वृक्ष लागवड केलेल्या वृक्षाचे संवर्धन करणे नितांत गरजेचे आहे.असे सांगून त्यांनी जिल्हयातील वृक्ष प्रेमी नागरीक तसेच सेवाभावी संस्थां, वृक्ष टिमने या बाबत आपल्या काही सुचना, प्रस्ताव सुचवावेत असे श्री. लोखंडे यांनी सूचित केले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.साळुंखे यांनी जिल्हयात वृक्ष लागवड बाबत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनेची माहिती विशद करुन वृक्ष लागवड करण्याच्या चळवळीत सर्वांनी सहकार्य करावे असे अवाहन केले.
या वृक्ष लागवड पुर्व तयारी आढावा बैठकीस जिल्हयातील लातूर वृक्ष प्रेमी नागरीक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.