पोलीस ठाणे MIDC ची कार्यवाही, जवळपास 95 Kg.गांजा सह 14 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, 03 आरोपींना अटक*


 

*पोलीस ठाणे MIDC ची कार्यवाही, जवळपास 95 Kg.गांजा सह 14 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, 03 आरोपींना अटक*




लातूर प्रतिनिधी 

                  या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलिस ठाणे MIDC मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते.

               मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे पथकांनी खाडगाव ते 05 नंबर जाणारे रिंगरोड वर  गोपनीय माहिती मधील एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार ज्याचा क्रमांक एम.एच.24 ए.एफ. 2095 असा असलेली कार येताना दिसली सापळा मधील अधिकारी व अंमलदार यांनी सदरची कार थांबवून त्या कारची झडती घेतली असता त्या कारचे पाठीमागील डिक्की ची शासकीय पंचा समक्ष झडती घेतली त्या मध्ये प्लास्टिकच्या 43 पिशव्या मध्ये तब्बल 94.6 किलोग्राम इतक्या वजनाच्या हिरव्या रंगाचा बीमिश्रित गांजा आढळून आला.

               सदर प्रतिबंधित गांजाची वाहतूक करणारे इसमांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 

1) वैभव रानबा उजगरे, वय-22 वर्ष, व्यवसाय-ड्रायव्हर राहणार-खाडगाव रोड, लातूर.

2) मनोज शेषराव जोगेश्वरी, वय-20 वर्ष, राहणार-सारोळा रोड,कुष्ठधाम,लातूर.

3) प्रेमनाथ चंद्रकांत शिंदे,वय 20 वर्ष, राहणार भारत, सोसायटी गवळी नगर, लातूर असे असून त्यांनी  तपासा दरम्यान स्वतःच्या फायद्यासाठी प्रतिबंधित गांजाची वाहतूक करीत असले बाबत सांगितले आहे. 

              त्यावरून पोलीस ठाणे MIDC येथे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे फिर्याद वरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 346/2021 कलम 20 (B) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात वरील 03 आरोपीताना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेला गांजा व ज्या कार मधून गांजाची वाहतूक करण्यात येत होती ती कार असा एकूण 14 लाख 86 हजार 730 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम हे करीत आहेत

                सदर पथकात उपनिरीक्षक  पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश कदम  श्री.संदीप कराड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगताप पोलीस अंमलदार श्री.सलगर,जाधव, बावणे, शेख, गिरी यांचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या