*लातूर पोलिस प्रशासन व महानगरपालिका ,लातूर यांचे संयुक्त विद्यमानाने अचानकपणे मोहीम, विनाकारण विनामास्क रस्त्यावर फिरणारे 107 लोकांची ऑंटीजन टेस्ट*
लातूर प्रतिनिधी
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, आज दि.02/06/2021 रोजी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांचे निर्देशांन्वये अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन शिवाजी नगर व गांधी चौक चे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी व संजय हिबारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन शिवाजी नगर व गांधीचौक हद्दीमध्ये अचानक पणे विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या 50 व्यक्तींना शिवाजी चौक येथे आणून व पोस्टे गांधीचौक हद्दीमध्ये 57 व्यक्तींना मोठ्या पोलीस व्हॅन मध्ये भरून गांधीचौक या ठिकाणी आणून एकूण 107 व्यक्तींची Covid -19 Antigen Test करण्यात आली सर्व रिपोर्ट निगेटिव्हआले असून सर्व व्यक्तींना विनाकारण मास्क शिवाय रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी न वावरणे बाबत समज देऊन सोडण्यात आले .
यानंतरही वेळोवेळी अचानकपणे सदरची मोहीम राबविण्यात येणार असून जे लोक विनाकारण नियमांचा भंग करून रस्त्यावर फिरतील त्यांची तपासणी करून कोरोना पॉझिटिव आल्यास त्यांची रवानगी थेट केअर सेंटर मध्ये करण्यात येणार आहे.
लातूर पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की नागरिकांनी त्यांच्या नियमांचे पालन करावे विनाकारण घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.